‘केंद्र आणि राज्यात शेतकरीविरोधी सरकार’
By admin | Published: October 13, 2016 05:28 AM2016-10-13T05:28:35+5:302016-10-13T05:28:35+5:30
केंद्र आणि राज्य शासनामध्ये निर्णय होत नाहीत़ शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळत नाही़ त्यामुळे सर्वत्र असंतोष आहे़ आपण सत्तेत
सोलापूर : केंद्र आणि राज्य शासनामध्ये निर्णय होत नाहीत़ शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळत नाही़ त्यामुळे सर्वत्र असंतोष आहे़ आपण सत्तेत आहोत, हेदेखील सरकारच्या लक्षात नाही. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे, असे ठराव ते त्यांच्या पक्षाच्या बैठकांमध्ये घेतात़ अडीच वर्षातील या सरकारचा कारभार अपयशी असून, हे सरकार शेतकरीविरोधी असल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना केली़
जिल्हा परिषदेच्या कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार वितरणासाठी पवार सोलापुरात आले होते. गेल्या अडीच वर्षातील सरकारचा कारभार ठोस नाही़ लवकर निर्णय नाहीत़ एससी, एसटी, ओबीसी, एऩटी़ आदींचे आरक्षण कमी न करता, मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे, असेही पवार म्हणाले़ (प्रतिनिधी)