माजी न्यायाधीशाचा अटकपूर्व जामीन फेटाळला
By admin | Published: August 8, 2014 11:39 PM2014-08-08T23:39:17+5:302014-08-08T23:39:17+5:30
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी माजी न्यायाधीशाचा अटकपूर्व जामीन अर्ज विशेष न्यायाधीश जे. टी. उत्पात यांनी फेटाळला.
Next
>पुणो : अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी माजी न्यायाधीशाचा अटकपूर्व जामीन अर्ज विशेष न्यायाधीश जे. टी. उत्पात यांनी फेटाळला. नागराज सुदाम शिंदे (वय 35, रा. आंबेगाव पठार) असे या न्यायाधीशाचे नाव असून, आता कोणत्याही क्षणी पोलीस त्याला अटक करू शकतात. दरम्यान, न्यायालयाने शिंदे याला शुक्रवारी (8 ऑगस्ट) न्यायालयात हजर राहण्याचा आदेश दिला होता. मात्र, शिंदे हजर झाला नव्हता.
शिंदे याची पत्नी घरी नसताना सुमारे दीड महिन्यापूर्वी त्याने ओळखीच्या 15 वर्षीय मुलीला दागिने आणि सदनिका देण्याचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला होता.
आरोपीच्या वतीने अॅड. नितीन पवार यांनी जामीन मिळावा यासाठी युक्तिवाद केला होता. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून शिंदेला शुक्रवारी न्यायालयात हजर राहण्याचा आदेश दिला होता. मात्र, शिंदे
शुक्रवारी न्यायालयात हजर राहिला नाही. (प्रतिनिधी)
सातारा जिल्ह्यातील खंडाळा न्यायालयात पाच-सहा महिन्यांपूर्वी शिंदे हा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी म्हणून सेवेत होता. बलात्कारप्रकरणी पीडित मुलीच्या वैद्यकीय अहवालात तिच्यावर बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच, मुलीच्या जबाबात शिंदेनेच बलात्कार केल्याचे नमूद असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले.