Sachin Vaze Arrest: अखेर सचिन वाझे यांना अटक; १३ तासांच्या झडतीनंतर NIA ने ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2021 01:17 AM2021-03-14T01:17:11+5:302021-03-14T07:01:00+5:30

एनआयएने सांगितल्यानुसार, सचिन वाझे यांना आईपीसीच्या कलम 286, 465, 473, 506(2), 120 बी आणि 4 (ए)(बी)(आय) स्फोटक वस्तू कलम 1908 अंतर्गत अटक करण्यात आली आहे.

Antilia case: NIA arrests mumbai police officer API sachin vaze | Sachin Vaze Arrest: अखेर सचिन वाझे यांना अटक; १३ तासांच्या झडतीनंतर NIA ने ठोकल्या बेड्या

Sachin Vaze Arrest: अखेर सचिन वाझे यांना अटक; १३ तासांच्या झडतीनंतर NIA ने ठोकल्या बेड्या

Next

मुंबई - प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीत स्फोटके सापडल्याप्रकरणी तब्बल 13 तासांच्या चौकशीनंतर एपीआय सचिन वाझे (Sachin Vaze) यांना एनआयएने अटक केली आहे. वाझे यांनी अटकेपासून वाचण्यासाठी शुक्रवारीच जिल्हा सत्र न्यायालय ठाणे येथे अंतरीम जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. याप्रकरणी 19 मार्चला सुनावणी होणार होती. (Antilia case: NIA arrests mumbai police officer API sachin vaze)

एनआयएने सांगितल्यानुसार, सचिन वाझे यांना आईपीसीच्या कलम 286, 465, 473, 506(2), 120 बी आणि 4 (ए)(बी)(आय) स्फोटक वस्तू कलम 1908 अंतर्गत अटक करण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांविरोधात वादग्रस्त टिप्पणी करणाऱ्या समित ठक्करने सचिन वाझेंबाबत केला खळबळजनक दावा

मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यूनंतर पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर आरोप झाल्याने या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे. याच पार्श्वफभूमीवर शनिवारी (13 मार्च) सकाळपासूनच सचिन वाझेंची एनआयएकडून चौकशी सुरू होती.

असं आहे प्रकरण - 

अंबानी यांच्या अँटिलिया घराबाहेर स्फोटके आणि धमकीचे पत्र असलेली स्कॉर्पिओ कार सापडल्यानंतर, या प्रकरणाचा तपास वाझे यांच्याकडे सोपविण्यात आला होता. मात्र, या स्कॉर्पिओ कारचे मालक व्यापारी मनसुख यांचा मृत्यू झाला आणि वाझे संशयाच्या भोवऱ्यात सापडले. या प्रकरणी विरोधी पक्षाने त्यांचे निलंबन करून तत्काळ अटकेची मागणी केली होती. यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हा तपास राज्य दहशतवाद विरोधी पथकाकडे (एटीएस) सोपविला होता.  दहशतवाद विरोधी पथकानेही मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणांत वाझे यांची तब्बल दहा तास चौकशी केली.

"पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचे एका शिवसेना नेत्यामध्ये आर्थिक संबंध", किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

विरोधकाच्या आक्रमक  पवित्र्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी गृहमंत्र्यांनी वाझे यांची बदली करण्याचे आदेश दिले. यानंतर शुक्रवारी त्यांची विशेष शाखा १ येथे बदली करण्यात आली आणि त्यांच्याकडे नागरी सुविधा केंद्राची जबाबदारी देण्यात आली. बदली झाल्यानंतर वाझे यांनी प्रतिक्रिया देताना, मी क्राईम ब्रान्चच्या सेवेतून मुक्त झालो, असे सांगत अधिक बोलणे टाळले होते.

वाझे यांचे व्हॉट्सअॅप स्टेटस - 
3 मार्च 2004 रोजी सीआयडीमधील काही अधिकाऱ्यांनी मला एका खोट्या प्रकरणात अटक केली होती. मला केलेली ही अटक आजपर्यंत अयोग्य आहे. या इतिहासाची मला आता पुन्हा जाणीव करून देत आहे. माझे सहकारी-अधिकारी मला चुकीच्या प्रकरणात अडकविण्याचा प्रयत्न करत आहेत, असा दावा सचिन वाझे यांनी व्हॉट्सअॅप स्टेटसद्वारे केला आहे. 

Mansukh Hiren Case : मनसुख हिरेन आणि सचिन वाझेंमधील संबंधांबाबत हिरेन यांच्या वकिलांचा मोठा गौप्यस्फोट, केला असा दावा

वाझे म्हणाले, सध्याच्या परिस्थितीत थोडा फरक आहे. 17 वर्ष माझ्याकडे अपेक्षा, सहनशीलता, आयुष्य आणि नोकरीही होती, पण आता माझ्याकडे आयुष्याची 17 वर्षेही नाहीत, ना नोकरी, ना जगण्याची अपेक्षा आहे, असं सचिन वाझे यांनी म्हटलं आहे. तसेच जगाचा निरोप घेण्याची वेळ जवळ येत आहे, असेही सचिन वाझेंनी म्हटल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. सचिन वाझेंच्या पोस्टनंतर वरिष्ठ अधिकारी त्यांच्या संपर्कात असून त्यांनी सचिन वाझेंना ही स्टेटस पोस्टही डिलीट करण्यास सांगितले होते.

अर्णब यांच्या अटकेसाठी ‘त्या’ स्कार्पिओचा वापर -
साहाय्यक निरीक्षक सचिन वाझे यांच्याकडील चौकशीतून धक्कादायक माहिती समोर येत आहे. हिरेन यांच्या महिंद्रा स्कॉर्पिओचा वापर सुमारे चार महिन्यांपूर्वी अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवेळी (४ नोव्हेंबर) करण्यात आला होता. २५ फेब्रुवारीला उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ जिलेटिनच्या कांड्या असलेली कार सापडली होती. ती तेव्हा वाझे यांच्याकडे होती. याच गाडीतून अर्णब गोस्वामी यांच्या घरी ते गेले होते. मात्र त्या वेळी या स्कॉर्पिओला अन्य नंबर प्लेट लावली होती, असे सूत्रांकडून सांगण्यात येते.

 

Web Title: Antilia case: NIA arrests mumbai police officer API sachin vaze

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.