Sachin Vaze Case: ...म्हणून सचिन वाझे करणार होते दोघांचा एन्काउंटर?; वेगळाच प्लॅन समोर आल्यानं नवा ट्विस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 08:11 PM2021-04-14T20:11:22+5:302021-04-14T20:13:43+5:30

Sachin Vaze Case: नवीन माहिती हाती लागल्याचे NIA कडून सांगण्यात आले आहे.

antilia case nia to investigate sachin vaze may have planned to kill more two person | Sachin Vaze Case: ...म्हणून सचिन वाझे करणार होते दोघांचा एन्काउंटर?; वेगळाच प्लॅन समोर आल्यानं नवा ट्विस्ट

Sachin Vaze Case: ...म्हणून सचिन वाझे करणार होते दोघांचा एन्काउंटर?; वेगळाच प्लॅन समोर आल्यानं नवा ट्विस्ट

Next
ठळक मुद्देसचिन वाझे प्रकरणी NIA सूत्रांकडून नवी माहितीवाझेंच्या घरी सापडले पासपोर्टसचिन वाझेंनी प्लान बी वापरला

मुंबई: प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ प्रकरणी सचिन वाझे (Sachin Vaze Case) यांना अटक करण्यात आली होती. यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी करत हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली होती. आता मात्र या प्रकरणाला वेगळे वळण लागले असून, नवीन माहिती हाती लागल्याचे NIA कडून सांगण्यात आले आहे. सचिन वाझे अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या वाहन प्रकरणी दोघांचे एन्काउंटर करून त्यांना या प्रकरणात गोवण्याची शक्यता होती, असा दावा तपास संस्थेकडून करण्यात आला आहे. (antilia case nia to investigate sachin vaze may have planned to kill more two person)

NIA च्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सचिन वाझेंनी आणखी दोन जणांचे एन्काउंटर करून त्यांना या प्रकरणात गुंतवण्याची योजना आखली होती. त्या दोन व्यक्ती औरंगाबाद येथून चोरण्यात आलेली Maruti Eeco कार चालवणार होते आणि स्फोटकांसह अंबानींच्या घराबाहेर पार्क करणार होते. सचिन वाझे यांना नशिबाने साथ दिली नाही आणि हा प्लॅन फसला, अशी माहिती मिळाली आहे.

“राज्यातील सर्व मंत्री आणि शेवटी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागेल”

वाझेंच्या घरी सापडले पासपोर्ट

सचिन वाझे यांच्या निवासस्थानी एक पासपोर्ट सापडला आहे. त्याच्यासह आणखी एका व्यक्तीचा एन्काउंटर करण्याचा कट आखला होता. यानंतर अंबीनींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या वाहन प्रकरणात त्यांना गुंतवले जाणार होते, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. १७ मार्च रोजी सचिन वाझेंच्या घरावर धाड टाकली असता हा पासपोर्ट मिळाला होता.

प्लान बी वापरला

कटानुसार, त्या दोन व्यक्तींचा त्याच दिवशी एन्काउंटर केला जाणार होता. यानंतर सचिन वाझे प्रकरणाचा उलगडा केल्याचे श्रेय घेणार होते. मात्र, सचिन वाझे यांना नशिबाने साथ दिली नाही आणि हा प्लॅन फसला आणि त्यांनी प्लॅन बी वापरला. यामध्ये मनसुख हिरेन यांच्या मालकीचे वाहन तिथे पार्क करण्यात आले. त्या दोन व्यक्तींची नावे उघड करण्यास एनआयएने नकार दिला आहे. 

दरम्यान, मनसुख हिरेन यांची हत्या नेमकी कोणी केली, याचा अद्यापही शोध लागलेला नाही. सचिन वाझे यांनी अटकेच्या एक दिवस आधी वापरलेला फोन अद्यापही तपास यंत्रणेच्या हाती लागलेला नाही. परंतु, एनआयएकडे तपास गेल्यापासून अनेक गोष्टींचा छडा लावण्यात तपास यंत्रणेला यश आल्याचे दिसत असून, या प्रकरणाशी निगडीत काही धक्कादायक बाबी उघडकीस आल्या आहेत.
 

Web Title: antilia case nia to investigate sachin vaze may have planned to kill more two person

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.