उपराजधानीला कॅन्सरचा विळखा

By Admin | Published: February 4, 2015 01:00 AM2015-02-04T01:00:20+5:302015-02-04T01:00:20+5:30

भारतात इतर राज्याच्या तुलनेत नागपुरात कॅन्सरसारखा जीवघेणा आजार झपाट्याने वाढत आहे. विशेषत: देशात स्तनाच्या कॅन्सरमध्ये नागपूर दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर अहमदाबाद आहे.

Antipartisan cancer diagnosis | उपराजधानीला कॅन्सरचा विळखा

उपराजधानीला कॅन्सरचा विळखा

googlenewsNext

स्तनाच्या कॅन्सरमध्ये देशात नागपूर दुसऱ्या स्थानी
सुमेध वाघमारे - नागपूर
भारतात इतर राज्याच्या तुलनेत नागपुरात कॅन्सरसारखा जीवघेणा आजार झपाट्याने वाढत आहे. विशेषत: देशात स्तनाच्या कॅन्सरमध्ये नागपूर दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर अहमदाबाद आहे. नागपुरात प्रत्येकी एक लाख लोकांमध्ये १०७ महिला तर ९७ पुरुष कॅन्सरच्या विळख्यात आहे. यातील अनेक रुग्ण मृत्युपंथाला जात असल्याची धक्कादायक वस्तुस्थिती आहे.
राज्यातील मुंबई, पुणे आणि औरंगाबाद या शहराच्या तुलनेत नागपुरात कॅन्सर रुग्णांची संख्या अधिक असून त्यात वाढ होत आहे. या शहरांमधील वैद्यकीय यंत्रसामग्री, उपकरणांचा तुलनात्मक अभ्यास केला तर नागपूरची परिस्थिती भयावह आहे. केंद्राने अलीकडेच देशातील आरोग्यसंबंधीचा अहवाल प्रकाशित केला आहे. त्यानुसार मुंबईच्या लोकसंख्येचा विचार केला तर एकट्या राजधानीत २२ हजार ८६४ कॅन्सर रु ग्णांची नोंद होत आहे.
नागपुरात हेच प्रमाण ४३००, पुण्यात ५९२७ तर औरंगाबादेत २०६४ आहे. सर्वच प्रकारच्या कॅन्सर रु ग्णांची नोंद घेतली तर नागपुरात दर लाख लोकसंख्येपैकी १०७ महिला तर ९७ पुरुषांचे प्रमाण आहे. कॅन्सरवर वेळीच उपाययोजना केली नाही तर एकट्या उपराजधानीत दर लाखात २२९ महिला तर १८२ पुरु ष कॅन्सरच्या उंबरठ्यावर पोहचण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण नागपुरात ३२ टक्के
देशात १९८२-८३ मध्ये एकूणच कॅन्सरमध्ये गर्भाशय मुखाचा कॅन्सर नंबर एकवर होता. त्यावेळी दुसऱ्या क्रमांकावर स्तनाचा (ब्रेस्ट) कॅन्सर होता मात्र मागील ३० वर्षात यात बदल झाला आहे. हा कॅन्सर जगभरातल्या स्त्रियांच्या मृत्यूचे सर्वांत मोठे कारण ठरत आहे. यात दगावणाऱ्या एकूण महिलांपैकी एकट्या भारतातील २३ टक्के महिलांचा समावेश आहे. हा आकडा ७० हजारांच्या घरात जातो. नागपुरात हे प्रमाण ३२ टक्के तर पहिल्या क्रमांकावर असलेल्या अहमदाबादमध्ये हे प्रमाण ३७ टक्के आहे.
-डॉ. क्रिष्णा कांबळे, प्रसिद्ध आॅन्कोलॉजी तज्ज्ञ

Web Title: Antipartisan cancer diagnosis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.