बागडे जर थांबले तर; विधानसभा लढवणार: अनुराधा चव्हाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 14:18 IST2019-07-16T14:13:45+5:302019-07-16T14:18:37+5:30
लोकसभा निवडणुकीत वयाचे कारण देत भाजप जेष्ठ नेते अडवाणींना पक्षाकडून डावलण्यात आले होते. त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीत बागडे यांना पक्षाकडून थांबण्याचे आदेश दिले जाण्याची चर्चा मोठ्याप्रमाणात सूर आहे.

बागडे जर थांबले तर; विधानसभा लढवणार: अनुराधा चव्हाण
मुंबई - विधानसभा निवडणुका अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यात प्रत्येक मतदारसंघात इच्छुकांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे. तर दुसरीकडे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या वयाचा विचार लक्षात घेत, यावेळी पक्षाकडून त्यांना माघार घेण्यासाठी प्रयत्न केले जाऊ शकतात अशी चर्चा पाहायला मिळत आहे. तसेच बागडे यांनी यावेळी थांबण्याचा निर्णय घेतला तर, भाजपकडून निवडणूक लढवण्यास आपण तयार असल्याचा दावा जिल्हा परिषद सदस्य अनुराधा चव्हाण यांनी केला आहे.
लोकसभा निवडणुकीत वयाचे कारण देत भाजप जेष्ठ नेते अडवाणींना पक्षाकडून डावलण्यात आले होते. त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीत बागडे यांना पक्षाकडून थांबण्याचे आदेश दिले जाण्याची चर्चा मोठ्याप्रमाणात सूर आहे. तर दुसरीकडे बागडे यांनी यावेळी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतलं तर फुलंब्री मतदारसंघातून भाजपकडून निवडणूक लढवण्याची तयारी केली असल्याचा दावा अनुराधा चव्हाण यांनी केला आहे. मात्र असे असली तरीही उपमहापौर विजय औताडे यांच्या रूपाने चव्हाण यांना पक्षातून आणखी एक स्पर्धक असणार आहे हे विशेष.
रावसाहेब दानवे यांच्या मर्जीतील अशी ओळख असलेल्या अनुराधा चव्हाण यांनी आपल्याला उमेदवारी मिळणार अशी अपेक्षा ठेवून मतदारसंघात अनेक दिवसांपासून भेटीगाठी आणि कार्यक्रमांवर भर दिला आहे. त्याचप्रमाणे विजय औताडे यांनी सुद्धा मतदारसंघात आपला संपर्क वाढवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.
पुढचा आमदार मीच
फुलंब्री मतदारसंघात जरी भाजपमध्ये इच्छुकांची गर्दी असली, तरीही पुढचा आमदार मीच असणार असे एका कार्यक्रमात हरिभाऊ बागडे यांनी जाहीर केले होते. त्यामुळे अवघ्या दोन महिने शिल्लक असलेल्या विधानसभा निवडणुकीत फुलंब्री मतदारसंघातून भाजपकडून कुणाला उमदेवारी मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.