घोरपडेंमुळे आबांच्या गोटात चिंता
By admin | Published: September 14, 2014 01:59 AM2014-09-14T01:59:28+5:302014-09-14T01:59:28+5:30
गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या बालेकिल्ल्यात माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांना पक्षात घेऊन आज (शनिवारी) भाजपाने राष्ट्रवादीला जबर हादरा दिला.
Next
श्रीनिवास नागे - सांगली
गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या बालेकिल्ल्यात माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांना पक्षात घेऊन आज (शनिवारी) भाजपाने राष्ट्रवादीला जबर हादरा दिला.
2क्क्9मध्येच विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची तयारी घोरपडेंनी केली होती, मात्र खुद्द शरद पवार यांनी त्यांना माघार घ्यायला लावली होती. नॅशनल हॉर्टिकल्चर सोसायटीच्या संचालकपदावर त्यांची बोळवण करण्यात आली होती. मात्र तेव्हापासून पक्षात घुसमट होत असल्याचा आरोप ते करीत होते. त्यात त्या वेळी त्यांना साथ मिळाली संजयकाका पाटील यांची. आर.आर. पाटील यांचे कट्टर विरोधक असणा:या संजयकाकांनी घोरपडेंना हाताशी धरून मतदारसंघात रान उठवले. राष्ट्रवादीच्या दुस:या फळीतील इतर चार नाराजांना घेऊन या दोघांनी ‘दुष्काळी फोरम’ स्थापन केला. आर.आर. पाटील, ग्रामविकासमंत्री जयंत पाटील, वनमंत्री पतंगराव कदम या जिल्ह्यातील तीन मंत्र्यांवर त्यांनी तोफा डागल्या. त्या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना बळ दिले होते.
सहा महिन्यांपूर्वी संजयकाकांनी भाजपामध्ये प्रवेश करून लोकसभेची उमेदवारी मिळवली आणि ते खासदारही झाले. त्याचवेळी घोरपडेंच्या भाजपाप्रवेशाची चर्चा सुरू झाली होती. संजयकाका खासदार झाल्यानंतर घोरपडेंनी उचल खाल्ली आणि आर.आर. पाटील यांच्याविरोधात भाजपाकडून लढण्याचे जाहीर केले. तसे ते दिवंगत राजारामबापूंचे अनुयायी. 1999मध्ये ते अपक्ष म्हणून निवडून आले.
विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात पाटबंधारे राज्यमंत्री म्हणून त्यांची वर्णी लागली. विलासराव देशमुख यांचे बंधू दिलीपराव यांचे साडू असल्यामुळेच घोरपडेंना राज्यमंत्रिपद मिळाल्याचे बोलले जात होते. काँग्रेसच्या संपर्कात आल्याने पतंगराव कदम यांच्या मदतीने 2क्क्4मध्ये त्यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली. त्या वेळी त्यांनी शिवाजीबापू शेंडगेंचे पुतणो जयसिंग शेंडगे यांचे बंड मोडून काढत हॅट्ट्रिक केली. 2क्क्9मध्ये मात्र मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यावर तासगाव-कवठेमहांकाळ असा एकत्रित मतदारसंघ उदयास आला. तेथून आबांना उमेदवारी मिळाल्याने घोरपडेंचा पत्ता कट झाला. त्यामुळे ते राष्ट्रवादीत गेले.
पक्षविरोधात कारवाया करूनही राष्ट्रवादीने त्यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस दाखवले नाही.