पाण्यासाठी व्याकूळ वानराचा मृत्यू

By admin | Published: April 20, 2016 09:24 PM2016-04-20T21:24:22+5:302016-04-20T21:24:22+5:30

केज तालुक्यात पाणीटंचाईमुळे तहानेने व्याकूळ झालेल्या वानराचा झाडावरून पडून तडफडून मृत्यू झाला आहे.

Anxious to water death death | पाण्यासाठी व्याकूळ वानराचा मृत्यू

पाण्यासाठी व्याकूळ वानराचा मृत्यू

Next

 ऑनलाइन लोकमत 

बीड, दि. २०- केज तालुक्यात पाणीटंचाईमुळे तहानेने व्याकूळ झालेल्या वानराचा झाडावरून पडून तडफडून मृत्यू झाला आहे.या वानराच्या मृत्यूनंतर कोठी येथील ग्रामस्थांनी त्याच्यावर वाजत गाजत अंत्यसंस्कार केले आहेत. केज तालुक्यातील कोठी येथील अनुरथ भैरट यांच्या शेतातील आंब्याच्या झाडावर चढलेल्या वानराचा तहानेने व्याकूळ अवस्थेत झाडावरून तोल गेल्यानंतर ते जमिनीवर कोसळले.  ही घटना बुधवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घडली. त्यानंतर थोड्याच वेळात या वानराने प्राण सोडला. त्यानंतर गावक-यांनी एकत्र येऊन या वानरावर अंत्यसंस्कार करून माणुसकीचं उत्तम उदाहरण घडवलं आहे. 

Web Title: Anxious to water death death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.