जे येणार नाही त्यांच्याशिवाय परिवर्तन होणारच- देवेंद्र फडणवीस
By admin | Published: January 26, 2017 08:39 PM2017-01-26T20:39:09+5:302017-01-26T20:44:21+5:30
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपासोबत 25 वर्षांची युती तोडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 26 - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपासोबत 25 वर्षांची युती तोडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. जे येतील त्यांच्यासोबत आणि जे येणार नाहीत, त्यांच्याशिवाय परिवर्तन करू, असं ट्विट करत त्यांनी शिवसेनेला प्रत्युत्तर दिलं आहे.
सत्ता हे साध्य नाही तर विकासाचे साधन आहे. पारदर्शी कारभार हाच आमचा मूलमंत्र असल्याचं यावेळी देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे. तसेच भाजपाचे खासदार किरीट सोमय्यांनीही शिवसेनेवर युती तोडल्यानं टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मुंबई महापालिकेत भाजपाची सत्ता येईल, मुंबई महापालिकेत भ्रष्टाचारमुक्त आणि पारदर्शी कारभार पाहिजे, असं शरसंधान किरीट सोमय्यांनी शिवसेनेवर सोडलं आहे.
सत्ता हे साध्य नाही तर साधनविकासाचेपारदर्शी कारभार हाच आमचा मूलमंत्रजे येतील त्यांच्यासोबत जे येणारनाहीत त्यांच्याशिवायपरिवर्तन तर होणारच
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) 26 January 2017