राज्य निवडणूक आयोगाचा ग्रामपंचायत निवडणुकीतील इच्छुकांना मोठा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2020 11:57 AM2020-12-16T11:57:25+5:302020-12-16T11:57:53+5:30

जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्याबाबतचा कोणताही पुरावा चालणार

Any proof of application for caste validity certificate will be valid | राज्य निवडणूक आयोगाचा ग्रामपंचायत निवडणुकीतील इच्छुकांना मोठा दिलासा

राज्य निवडणूक आयोगाचा ग्रामपंचायत निवडणुकीतील इच्छुकांना मोठा दिलासा

googlenewsNext

पुणे : जिल्ह्यातील 748 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या असून, राखीव जागांवर निवडणुका लढवू इच्छिणाऱ्यांची धावपळ सुरू आहे. यामध्ये राज्य निवडणूक आयोगाने दिलासा दिला आहे. यात राखीव जागांवर ग्रामपंचायत निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे जात वैधता प्रमाणपत्र नसल्यास पडताळणी समितीकडे हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी केलेल्या अर्जाची सत्यप्रत अथवा पोचपावती किंवा अर्ज केल्याबाबतचा कोणताही पुरावा सादर करण्याची मुभा  राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारांना दिली आहे.

राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी जिल्हा निवडणूक प्रशासनाला यासंदर्भात कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.   राज्य निवडणूक आयोगाने 11 डिसेंबर रोजी जाहीर केलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी 30 डिसेंबर पर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. राखीव जागांवर निवडणूक लढविण्यासाठी नामनिर्देशपत्र दाखल करताना जातवैधता प्रमाणपत्र नसल्यास जात पडताळणी समितीकडे जात वैधता प्रमाणपत्रासाठी केलेल्या अर्जाबाबतचा पुरावा सादर करण्याबरोबरच एक हमीपत्रही देणे आवश्यक राहील. 

ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवारांना विजयी झाल्याच्या दिनांकापासून 12 महिन्यांच्या आत पडताळणी समितीने दिलेले जात वैधता प्रमाणपत्र सादर केले जाईल, असे या हमीपत्रात नमूद करावे लागेल. राज्य निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राखीव जागांवर उभ्या राहणाऱ्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे तसेच जात पडताळणीसाठी ऐनवेळी होणारी गर्दी आणि या समितीच्या कार्यालयामध्ये होणारा गैरव्यवहार देखील थांबणार आहे. या निवडणुकीसाठी 23 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होत आहे.

Web Title: Any proof of application for caste validity certificate will be valid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.