‘जिजामाता’च्या कऱ्हाड शाखेत अपहार
By Admin | Published: December 17, 2015 01:49 AM2015-12-17T01:49:31+5:302015-12-17T01:49:31+5:30
जिजामाता महिला सहकारी बँकेत अपहार झाल्याप्रकरणी कऱ्हाड शाखेत १३ कोटी ७६ लाखांचा अपहार झाल्याची फिर्याद लेखापरीक्षकांनी पोलिसांत दिली आहे. या फिर्यादीवरून
कऱ्हाड : जिजामाता महिला सहकारी बँकेत अपहार झाल्याप्रकरणी कऱ्हाड शाखेत १३ कोटी ७६ लाखांचा अपहार झाल्याची फिर्याद लेखापरीक्षकांनी पोलिसांत दिली आहे. या फिर्यादीवरून बँकेच्या अध्यक्ष अॅड. वर्षा माडगूळकर यांच्यासह अधिकारी, शाखा अधिकारी व अपहाराच्या रकमेचा लाभ घेणाऱ्या अज्ञातांवर गुन्हा नोंदविला आहे.
पोलिसांनी सांगितले की, १ एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०१४ या कालावधीत वर्षा माडगूळकर, अधिकारी, शाखाधिकारी, अज्ञात व्यक्ती व संस्था यांनी कऱ्हाड शाखेतील दप्तरी रेकॉर्डला खोट्या नोंदी केल्याचे, लेखापरीक्षक तानाजीराव जाधव यांना दिसून आले, तसेच बँकेतून चेकने, आरटीजीएस, एनईएफटीने व वर्ग नोंदी करून, १३ कोटी ७६ लाख ६४ हजार ३८६ रुपयांचा अपहार केल्याचेही स्पष्ट झाल्याने त्यांनी फिर्याद दिली आहे.