‘एपीएमसी’त दोन गाळ्यांना आग

By admin | Published: April 3, 2017 05:37 AM2017-04-03T05:37:48+5:302017-04-03T05:37:48+5:30

एपीएमसी मसाला मार्केटमधील दोन बंद गाळ्यांना रविवारी दुपारी आग लागली

In the APMC, two sludge fire | ‘एपीएमसी’त दोन गाळ्यांना आग

‘एपीएमसी’त दोन गाळ्यांना आग

Next

नवी मुंबई : एपीएमसी मसाला मार्केटमधील दोन बंद गाळ्यांना रविवारी दुपारी आग लागली. या आगीमध्ये त्या ठिकाणचा मसाल्याचा साठा जळून खाक झाल्याने, व्यापाऱ्याचे सुमारे एक कोटींचे नुकसान झाले आहे. याच वेळी आग विझवण्याच्या प्रयत्नात अग्निशमन दलाची गाडी उलटून दोघे कर्मचारी जखमी झाले आहेत.
मसाला मार्केटमधील बी विंगच्या ३३ व ३४ क्रमांकाच्या गाळ्यांना दुपारी १ वाजण्याच्या सुमारास आग लागली. विजेच्या शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दोन्ही गाळ्यांमध्ये दगडफूल, तेजपत्ता अशा मसाला पदार्थांसह आयुर्वेदिक वनौषधींचा साठा होता. त्यामुळे आगीत हे पदार्थ पेटल्याने मोठ्या प्रमाणात धूर पसरला होता. आग मोठी असल्यामुळे ती आटोक्यात आणण्यासाठी अधिक प्रमाणात पाण्याचा मारा करावा लागत होता. याकरिता पहिल्या टँकरचे (वॉटर बाउझर) पाणी संपल्याने, दुसरे वाहन मागवले होते. दुसरा वॉटर बाउझर पाणी घेऊन वेगात घटनास्थळाकडे येत असताना, मसाला मार्केटच्या प्रवेशद्वारावर वळण घेताना तो उलटला. यामध्ये टँकरचालक परमेश्वर अरेनवुरू व फायरमन संतोष जाधव हे दोघे जखमी झाले. त्यांना वाशीतील पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गाळ्याच्या मागच्या बाजूची भिंत फोडून मसाला बाहेर काढला. अखेर अग्निशमन दलाच्या प्रयत्नांनंतर पाच तासांनी आग नियंत्रणात आली. (प्रतिनिधी)

Web Title: In the APMC, two sludge fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.