भुजबळांविरुद्ध माफीचा साक्षीदार?

By Admin | Published: March 23, 2016 03:51 AM2016-03-23T03:51:15+5:302016-03-23T03:51:15+5:30

महाराष्ट्र सदन गैरव्यवहारप्रकरणी किमान एका व्यक्तीस माफीचा साक्षीदार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सक्तवसुली संचालनालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली

An apology witness against Bhujbal? | भुजबळांविरुद्ध माफीचा साक्षीदार?

भुजबळांविरुद्ध माफीचा साक्षीदार?

googlenewsNext

डिप्पी वांकाणी,  मुंबई
महाराष्ट्र सदन गैरव्यवहारप्रकरणी किमान एका व्यक्तीस माफीचा साक्षीदार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सक्तवसुली संचालनालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली, तर मुुंबई एज्युकेशन ट्रस्टच्या त्या माजी चार कर्मचाऱ्यांना या प्रकरणात आरोपी करण्यात येणार आहे. या चार जणांना भुजबळ यांच्या कंपनीत डमी संचालक बनविण्यात आले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अशा व्यक्तीला लवकरच अटक करण्यात येईल, जो व्यक्ती माफीचा साक्षीदार असेल.
ईडीच्या सूत्रांनी सांगितले की, माफीचा हा साक्षीदार या प्रकरणातील आपली आणि अन्य व्यक्तींची भूमिका स्पष्ट करेल. त्यामुळे या प्रकरणात आमची बाजू भक्कम होईल. दरम्यान, मुंबई एज्युकेशन ट्रस्टचा या पूर्वीच गुन्हा दाखल केलेला एखादा कर्मचारी माफीचा साक्षीदार होउ शकतो का? असा प्रश्न केला असता, या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘आम्ही यापूर्वी काही साक्षीदारांचे जबाब घेतले आहेत. यातील काही जणांनी या प्रकरणातील आपली भूमिका स्वीकार केलेली आहे. छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांच्या भूमिकेवरही या साक्षीदारांनी भाष्य केले आहे. अर्थात, या साक्षीदारांपैकी एका व्यक्तीवर आम्ही त्याच्या या प्रकरणातील सहभागाबाबत गुन्हा दाखल करू शकतो, पण सदर व्यक्तीने इतर आरोपींच्या सहभागाबाबत माहिती दिल्यास, त्याला काही सूट मिळू शकते.’
अमित बिराज या माजी कर्मचाऱ्याला देवीशा इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीचे डमी संचालक बनविण्यात आले होते. मनी लाँड्रिंगमधून (काळा पैसा व्हाइट करणे) खारघरमधील हेक्स वर्ल्डचा भूखंड खरेदी करण्यासाठी हे सर्व करण्यात आले होते. ईडीसमोरील आपल्या जबाबात त्याने सांगितले आहे की, कशाप्रकारे लेदरबॅगमधून वांद्र्याच्या कार्यालयात पैसा आणला गेला. तेथे छगन भुजबळांच्या उपस्थितीत हा पैसा रिअल इस्टेटच्या खरेदीसाठी रवाना झाला. बिराज याने असेही सांगितले की, ‘कशाप्रकारे एका इमारतीच्या दहाव्या मजल्यावरील कार्यालयात मशिनद्वारे पैसे मोजून लॉकरमध्ये ठेवले जात होते.’
> सुनील नाईक (भुजबळांचे सीए) : आर्मस्ट्राँग एनर्जी आणि परवेश कन्स्ट्रक्शनचे शेअर संशयित संस्थांना विकले. ९९० रुपये प्रति शेअरने या माध्यमातून ५० कोटी जमा केले.
मुंबई एज्युकेशन ट्रस्टच्या वांद्रा कार्यालयात आपणाला पैसे मिळाल्याचे मार्केट आॅपरेटर सुरेश जजोदिया यांनी सांगितले. कोलकातास्थित हवाला आॅपरेटरच्या माध्यमातून खात्यात पैसे वर्ग करण्यात आले.
कंपन्यांचे कंट्रोलर असलेल्या प्रवीण जैन यांनी सांगितले की, सुनील नाईक यांच्याकडून आपणाला पैसे मिळाले. आर्मस्ट्राँग एनर्जीच्या बँक खात्यात १०.५० कोटी रुपये चेकद्वारे भरण्यात आले.
जैन यांचे कर्मचारी असलेले
प्रभाकर सोगम यांनी सांगितले
की, एमईटीच्या वांद्रे येथील कार्यालयातून अनेकदा पैसे
जमा केले.
कोलकात्यातील आर्थिक सल्लागार संजीव जैन यांनी सांगितले की, ‘सुनील नाईक यांच्याकडून आठ कोटी रुपये प्राप्त झाले. आर्मस्ट्राँग एनर्जी आणि परवेश कन्स्ट्रक्शनच्या नावे चेकद्वारे पेमेंट करण्यात आले.’
चंद्रशेखर सारडा (सीए) यांनी
मिनुटेक्स प्रोसेसर प्रायव्हेट
लिमिटेड आणि मंगल सागो प्रा. लिमिटेडसाठी १०.२४ कोटी आणि १५.७८ कोटी रुपयांची व्यवस्था केली. त्यानंतर हे पैसे परवेश कन्स्ट्रक्शनकडे वळते केले.

Web Title: An apology witness against Bhujbal?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.