पावसाळ्यात सतर्क करणार अ‍ॅप

By admin | Published: June 11, 2016 02:05 AM2016-06-11T02:05:32+5:302016-06-11T02:05:32+5:30

पावसाचा अंदाज, पाणी भरल्याची ठिकाणे, वळवलेली वाहतूक अशी सर्व माहिती रहिवाशांना आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे़

The app to alert the monsoon | पावसाळ्यात सतर्क करणार अ‍ॅप

पावसाळ्यात सतर्क करणार अ‍ॅप

Next


मुंबई : पावसाचा अंदाज, पाणी भरल्याची ठिकाणे, वळवलेली वाहतूक अशी सर्व माहिती रहिवाशांना आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे़ पावसाळ्यात मुंबईकरांना सतर्क करण्यासाठी पालिकेने अ‍ॅप आणले आहे़ या अ‍ॅपच्या माध्यमातून संकटात असलेल्या व्यक्तीच्या नातेवाइकांपर्यंत सूचना पोहोचण्याचीही सुविधा आहे़ अशा प्रकारचे हे पहिलेच अ‍ॅप आहे़
अ‍ॅण्ड्रॉइड व आयओएस मोबाइल प्रणालीवर हे अ‍ॅप डाऊनलोड करता येणार आहे़ यावर पावसाळी व भौगोलिक परिस्थितीची माहिती, आणीबाणी प्रसंगी संपर्क कुठे करावा, अशी माहिती असणार आहे़ १४ जूनपासून हे अ‍ॅप सुरू होत आहे़ विशेष म्हणजे या अ‍ॅपवरील एसओएस सुविधेवर क्लिक केल्यास जवळचे नातेवाईक, मित्र यांच्या मोबाइल क्रमांकावर संकटात अडकलेल्या व्यक्तीच्या भौगोलिक माहितीसह एसएमएस पोहोचेल़ जेणेकरून त्यास तत्काळ मदत उपलब्ध होऊ शकेल़
इमर्जन्सी या अ‍ॅपवर क्लिक केल्यास पीडित व्यक्तीपासून पाचशे मीटरपर्यंत त्या परिसरात असलेली पोलीस ठाणी, रुग्णालय, अग्निशमन दल आणि विभाग कार्यालयांची यादीच पाहता येईल़ (प्रतिनिधी)
>वाहतूककोंडी, त्यामुळे वळविण्यात आलेला मार्ग, रेल्वे सेवेची माहिती या अ‍ॅपवर तत्काळ उपलब्ध होणार आहे़
दररोजच्या हवामानाचा अंदाज भारतीय वेधशाळेच्या सहकार्याने उपलब्ध होणार आहे़
पावसाचा अंदाज, पाणी भरल्याची ठिकाणे, वळवलेली वाहतूक याची माहिती मिळणार आहे़
टउॠट ऊकरअरळएफ टअठअॠएटएठळ या नावाने हे अ‍ॅप उपलब्ध असेल.

Web Title: The app to alert the monsoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.