अत्रे कट्ट्याच्या उपक्रमाचा अ‍ॅप हवा

By Admin | Published: May 17, 2016 03:54 AM2016-05-17T03:54:52+5:302016-05-17T03:54:52+5:30

तरुण पिढीकडे पोहोचायचे असल्यास त्यांच्या खिशातील मोबाइलकडे वळणे गरजेचे आहे.

The app windscreen has been launched | अत्रे कट्ट्याच्या उपक्रमाचा अ‍ॅप हवा

अत्रे कट्ट्याच्या उपक्रमाचा अ‍ॅप हवा

googlenewsNext


ठाणे : तरुण पिढीकडे पोहोचायचे असल्यास त्यांच्या खिशातील मोबाइलकडे वळणे गरजेचे आहे. म्हणजेच, त्यांच्या खिशातून हृदयाकडे जाण्याचा मार्ग सोपा होतो. अत्रे कट्ट्यासारख्या उपक्रमात त्यांना सहभागी करून घेण्यासाठी अ‍ॅपची निर्मिती करा, असा सल्ला डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू संजय ओक यांनी दिला.
रविवारी गडकरी रंगायतन येथे अत्रे कट्ट्याचा १५ वा वर्धापन दिन साजरा झाला. या वेळी बोलताना ओक यांनी सांगितले की, आजची तरुण पिढी लिहू शकत नाही; पण टेक्सटिंग करते. बोलू शकत नाही, पण ब्लॉकिंग करते. त्यामुळे अ‍ॅपची निर्मिती केल्यास त्यांचा सहभाग वाढण्यास मदत होईल.
अत्रे कट्ट्याने चालू केलेला उपक्रम कौतुकास्पद आहे. तसेच आता स्वत:चे हक्काचे सभागृह घ्यावे, म्हणजे असे अनेक चांगले कार्यक्रम त्यांना करता येतील आणि रसिक ठाणेकरांना त्या कार्यक्रमाचा आनंद घेता येईल, असे सांगून आ. प्रताप सरनाईक यांनी त्यांना मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहन केले.
व्यासपीठावर आ. प्रताप सरनाईक, संपदा वागळे, विदुला ठुसे, शीला वागळे, अनंत मराठे आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी अनुजा वर्तक यांचा ‘हृदयी प्रीत जागते’ हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात निलेश निरगुडकर यांनी ‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ या गाण्याने केली. त्यानंतर, कार्यक्रमाचे शीर्षक गीत ‘हृदयी प्रीत जागते, जाणता न जाणता’, हे गाणे सादर करताच रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. आचार्य अत्रे यांना ‘संगीत संशयकल्लोळ’ हे नाटक आवडायचे. विशेष म्हणजे याच नाटकातील ‘मजवरी तयाचे प्रेम खरे’ हे पद त्यांना अधिक आवडे, अशी निवेदिका दीपाली केळकर यांनी त्यांची आठवण सांगितली. त्यानंतर, कश्मिरा राईलकर यांनी आपल्या सुंदर आवाजातून हे पद सादर केले. सासू आणि सुनेचे नाते आता बदलले असल्याचे निवेदिका केळकर यांनी नमूद करताच गायिका वर्तक यांनी ‘मुली तू आलीस आपल्या घरी’ हे गाणे सादर केले. गायिका राईलकर आणि गायक निरगुडकर यांनी ‘धुंदीत राहू मस्तीत गाऊ’ हे गाणे सादर केले. त्यानंतर ‘भरजरी गं पितांबर दिला आणून द्रौपदीस बंधू शोभे नारायण’, ‘तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांचा माळा’, ‘काय सांगू शेणी बाई माझा माहेरचा थाट’, ‘राधा कृष्णावर भाळली’, ‘ऐन दुपारी यमुनातीरी’ अशी अनेक गाणी सादर करण्यात आली. मयूरेश शेर्लेकरच्या ढोलकीवादनाने कार्यक्रमाची रंगत वाढली.

Web Title: The app windscreen has been launched

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.