मॅगीविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अपील

By admin | Published: October 10, 2015 03:06 AM2015-10-10T03:06:12+5:302015-10-10T03:06:12+5:30

मॅगी विक्रीवर आणलेली बंदी मुंबई उच्च न्यायालयाने उठवली असली तरी या निर्णयाच्या विरोधात सर्वाेच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

Appeal against Maggi in Supreme Court | मॅगीविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अपील

मॅगीविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अपील

Next

मुंबई : मॅगी विक्रीवर आणलेली बंदी मुंबई उच्च न्यायालयाने उठवली असली तरी या निर्णयाच्या
विरोधात सर्वाेच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. विधी व न्याय विभागाने तसा अभिप्राय दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र अन्न व औषधी प्रशासनाने ६ जून रोजी मॅगी विक्रीवर बंदी घातली होती. मात्र त्यास उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.
सरकारने ज्या लॅबमधून मॅगीच्या तपासण्या नॅशनल अ‍ॅक्रीडेशन बोर्ड आॅफ लॅबॉरेटरीजशी (एनएबीएल) सलग्न नसलेल्या लॅबमधून झाल्याने हे रिपोर्ट ग्राह्ण धरु नयेत.
कंपनीने बंगळूर, जयपूर, नोयडा येथील एनएबीएल लॅबमधून त्यांच्या स्टॉकमधील सॅम्पल घेऊन तपासणी करावी, असे आदेश न्यायालयाने दिले होते.
या प्रकरणी एफडीएनी सर्वोच्च न्यायालयात स्पेशल लिव्ह पिटीशन दाखल करावे अशी शिफारस विधी व न्याय विभागाने केली आहे. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Appeal against Maggi in Supreme Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.