मराठी, हिंदी निम्न आणि उच्चस्तर परीक्षेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

By Admin | Published: November 19, 2016 02:45 AM2016-11-19T02:45:14+5:302016-11-19T02:45:14+5:30

मराठी भाषा निम्नस्तर व उच्चस्तर परीक्षा १५ जानेवारी २०१७ रोजी मुंबई, पुणे, नागपूर व औरंगाबाद या चार विभागीय ठिकाणी घेण्यात येणार आहेत.

Appeal to apply for Marathi, Hindi and Higher level examinations | मराठी, हिंदी निम्न आणि उच्चस्तर परीक्षेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

मराठी, हिंदी निम्न आणि उच्चस्तर परीक्षेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

googlenewsNext


मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सेवेत असलेल्या अमराठी भाषिक अराजपत्रित कर्मचाऱ्यांसाठी मराठी भाषा निम्नस्तर व उच्चस्तर परीक्षा १५ जानेवारी २०१७ रोजी मुंबई, पुणे, नागपूर व औरंगाबाद या चार विभागीय ठिकाणी घेण्यात येणार आहेत. तसेच अमराठी भाषिक राजपत्रित अधिकाऱ्यांसाठी एतदर्थ मंडळामार्फत आयोजित करण्यात येणारी मराठी भाषा निम्नस्तर व उच्चस्तर परीक्षा ५ फेब्रुवारी २०१७ रोजी पुणे केंद्रावर घेण्यात येणार आहे. याबरोबरच एतदर्थ मंडळामार्फत हिंदी भाषा निम्नश्रेणी व उच्चश्रेणी परीक्षा २९ जानेवारी, २०१७ रोजी मुंबई, पुणे, नागपूर व औरंगाबाद या चार विभागीय ठिकाणी घेण्यात येणार आहेत.
मराठी भाषा निम्नस्तर व उच्चस्तर परीक्षेसाठी विहित नमुन्यातील आपली आवेदनपत्रे विभाग प्रमुख/कार्यालय प्रमुख यांच्यामार्फत संबंधित विभागीय कार्यालयांकडे ९ डिसेंबर, २०१६ पर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. तसेच एतदर्थ मंडळामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या पुढील मराठी भाषा निम्नस्तर व उच्चस्तर परीक्षेसाठी विहित नमुन्यातील आपली आवेदपत्रे विभाग प्रमुख/कार्यालय प्रमुख यांच्यामार्फत ३० डिसेंबर, २०१६ पर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. एतदर्थ मंडळामार्फत हिंदी भाषा निम्नश्रेणी व उच्चश्रेणी परीक्षेसाठी विहित नमुन्यातील आपली आवेदनपत्रे विभाग प्रमुख/कार्यालय प्रमुख यांच्यामार्फत संबंधित विभागीय कार्यालयाकडे २० डिसेंबर, २०१६ पर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.
परीक्षेसंबंधी अधिक माहिती आवश्यक असल्यास उपरोक्त संबंधित विभागीय सहायक भाषा संचालक यांच्याशी किंवा भाषा संचालक यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन भाषा संचालक यांनी प्रसिध्दीपत्रकादवारे केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Appeal to apply for Marathi, Hindi and Higher level examinations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.