साहित्य संस्थांना अनुदानासाठी अर्ज करण्याचे आवाहन
By admin | Published: April 26, 2016 03:02 AM2016-04-26T03:02:57+5:302016-04-26T03:02:57+5:30
साहित्य संस्थाना २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी सहायक अनुदान देण्यासाठी पात्र संस्थांकडून १ ते ३१ मे २०१६ या कालावधीत अर्ज मागविण्यात येत आहेत.
मुंबई : महाराष्ट्रात आयोजित करण्यात येणाऱ्या अन्य मराठी साहित्य संमेलनासाठी संस्था नोंदणी अधिनियम १८६० आणि सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० अंतर्गत नोंदणीकृत असणाऱ्या साहित्य संस्थाना २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी सहायक अनुदान देण्यासाठी पात्र संस्थांकडून १ ते ३१ मे २०१६ या कालावधीत अर्ज मागविण्यात येत आहेत.
राज्यात अन्य मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करणाऱ्या साहित्य संस्था अनुदानासाठी अर्ज करु शकतील. हे अर्ज महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्यमंदिर इमारत, दुसरा मजला, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी सयानी रोड, प्रभादेवी, मुंबई - २५ या पत्त्यावर कार्यालयीन वेळेत पाठवावेत. अर्ज विहित नमुन्यात व कालावधीत साहित्य आणि संस्कृती मंडळाकडे सादर करणे बंधनकारक असेल.