ग्राहकांना मो.नंबर ई-मेल नोंदणीचे आवाहन

By Admin | Published: June 25, 2016 03:33 AM2016-06-25T03:33:57+5:302016-06-25T03:33:57+5:30

महावितरणच्या विविध ग्राहक सुविधांचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण)च्या ग्राहकांनी आपला मोबाइल क्रमांक व ई-मेल आयडीची नोंदणी करण्याचे

Appeal to the customers' e-mail registration | ग्राहकांना मो.नंबर ई-मेल नोंदणीचे आवाहन

ग्राहकांना मो.नंबर ई-मेल नोंदणीचे आवाहन

googlenewsNext

मुंबई : महावितरणच्या विविध ग्राहक सुविधांचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण)च्या ग्राहकांनी आपला मोबाइल क्रमांक व ई-मेल आयडीची नोंदणी करण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे. राज्यभरातील सुमारे २३ लाख वीजग्राहकांनी मोबाइल अथवा ई-मेल आयडीची आतापर्यंत नोंदणी केली आहे.
मोबाइल क्रमांक किंवा ई-मेलची नोंदणी करण्यासाठी पर्याय आहेत. यात १९१२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय महावितरणच्या संकेतस्थळावर किंवा मोबाइल अ‍ॅपवर नोंदणीची सुविधा आहे. ई-मेल आयडीची नोंदणी केल्यास ग्राहकांसमोर ई-बिल व गो-ग्रीन असे दोन पर्याय उपलब्ध आहेत. अधिक माहिती संकेतस्थळावर मिळेल. (प्रतिनिधी)

Web Title: Appeal to the customers' e-mail registration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.