पंतप्रधान पीक विमा योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
By admin | Published: July 21, 2016 03:04 AM2016-07-21T03:04:34+5:302016-07-21T03:04:34+5:30
अलिबाग, पेण व मुरुड येथे केंद्र पुरस्कृत पंतप्रधान पीक विमा योजना व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना राबविण्यात येत आहेत.
पेण : कृषी विभागांतर्गत खरीप हंगाम-२०१६-१७ मध्ये अलिबाग उपविभागांतर्गत अलिबाग, पेण व मुरुड येथे केंद्र पुरस्कृत पंतप्रधान पीक विमा योजना व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पंतप्रधान पीक विमा योजनेचा हेतू- नैसर्गिक आपत्ती, कीड व रोग इत्यादीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देवून त्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे हा आहे. ही योजना कर्जदार शेतकऱ्यांना बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. या योजनेंतर्गत भात पिकासाठी शेतकऱ्यांने भरावयाचा विमा हप्ता दर एकरी रु पये ३१२ व हेक्टरी रु पये ७८० इतका आहे. या योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ३१ जुलै आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी नजीकच्या बँक शाखेत सातबारा व ८ अ उतारा, पेरणी प्रमाणपत्र, रद्द चेक, पासबुक झेरॉक्स, रेशनकार्ड, आधारकार्ड झेरॉक्स व फोटो या आवश्यक कागदपत्रांसह संपर्क साधावा.
या योजनेंतर्गत वैयक्तिक लाभार्थींच्या शेताच्या बांधावर तसेच पडीक शेतजमिनीवर आंबा, काजू, नारळ, सुपारी, चिकू, कोकम, शेवगा, बांबू, साग, गिरीपुष्प इत्यादी फळपिकांची अथवा वृक्षांची लागवड करता येते.
>योजनेचे लाभार्थी
योजनेंतर्गत अनुसचित जाती, अनुसूचित जमाती, दारिद्रय रेषेखालील, इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानले आहे.