दहावी, बारावी परीक्षांसाठी 15 पासून अर्ज, अर्जाचा नमुना मंडळाच्या संकेतस्थळावर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2017 08:11 AM2017-09-10T08:11:03+5:302017-09-10T12:51:54+5:30

 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणा-या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया दि. १५ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

Application for Class X, XII examinations, 15 on the Sample Board's website | दहावी, बारावी परीक्षांसाठी 15 पासून अर्ज, अर्जाचा नमुना मंडळाच्या संकेतस्थळावर

दहावी, बारावी परीक्षांसाठी 15 पासून अर्ज, अर्जाचा नमुना मंडळाच्या संकेतस्थळावर

Next

पुणे, दि. 10 - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणा-या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया दि. १५ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. यासाठी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांची माहिती संकलित करून ठेवावी, असे आवाहन मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी केले आहे.

दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी अर्जामध्ये या वर्षी काही बदल करण्यात आले आहेत. या अर्जाचा नमुना मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा अर्ज भरण्यासाठी तांत्रिक अडचणी निर्माण होणार नाही, तसेच वेळेत काम पूर्ण होईल, यासाठी आधीच माहिती संकलित करणे आवश्यक आहे. यामध्ये विद्यार्थ्यांच्या नावाचे अचूक स्पेलिंग, जन्मदिनांक, आईचे नाव, जन्मस्थळ, विद्यार्थ्यांनी परीक्षेला घ्यायचे विषय व माध्यम, विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक, विद्यार्थ्यांचे पासपोर्ट आकाराचे छायाचित्र व सही स्कॅन करून ठेवणे, तसेच अर्ज भरताना विद्यार्थी कला, चित्रकला, लोककला व क्रीडा सवलतीचे गुण मिळण्यासाठी अर्ज करणार आहे किंवा नाही, याबाबत उल्लेख करणे, या सर्व बाबींचे माहिती संकलित करणे आवश्यक आहे, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.

Web Title: Application for Class X, XII examinations, 15 on the Sample Board's website

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.