कल्पना गिरी खून प्रकरणात न्यायाधीशांकडे दाखल केला विनंती अर्ज

By Admin | Published: August 12, 2016 10:50 PM2016-08-12T22:50:21+5:302016-08-12T22:50:21+5:30

कल्पना गिरी या बहुचर्चित खून प्रकरणातील आरोपींनी स्वत:हून नार्को टेस्ट करण्याची मागणी लातूर जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांकडे एका विनंती अर्जाव्दारे केली

The application for the petition filed by the judges in Kalpana Giri murder case | कल्पना गिरी खून प्रकरणात न्यायाधीशांकडे दाखल केला विनंती अर्ज

कल्पना गिरी खून प्रकरणात न्यायाधीशांकडे दाखल केला विनंती अर्ज

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. 12- कल्पना गिरी या बहुचर्चित खून प्रकरणातील आरोपींनी स्वत:हून नार्को टेस्ट करण्याची मागणी लातूर जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांकडे एका विनंती अर्जाव्दारे केली आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच हे प्रकरण सीआयडीकडून सीबीआयकडे वर्ग करण्यात आले आहे. त्यातच आता खुद्द आरोपींनीच नार्को टेस्टची मागणी केली आहे.
लातूर शहरातील काँग्रेसची कार्यकर्ती असलेल्या कल्पना मंगल गिरी ही २१ मार्च २०१४ रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास पक्षाच्या कार्यक्रमासाठी जाते म्हणून घराबाहेर पडली होती. ती संध्याकाळपर्यंत घरी परतली नाही म्हणून तिचा शोध घेत असतानाच कल्पना ही ज्या स्कुटीवर गेली होती. ती स्कुटी (एम. एच. २४ एस. १६७१) एका कार्यालयात आढळून आली होती. दरम्यान, २३ मार्च २०१४ रोजी तुळजापूर नजीकच्या पाचुंदा तलावात तिचे प्रेत तरंगताना आढळून आले. या प्रकरणी २७ मार्च २०१४ रोजी कल्पनाचे वडिल मंगल गिरी यांच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलिस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणातील तीन आरोपी अद्यापही तुरुंगात बंदिस्त आहेत. तर अन्य आरोपी जामीनावर आहेत. या प्रकरणात आपली नार्को स्टेस्ट, ब्रेन मॅपींग, पॉलीग्राफी टेस्ट, लाय डिटेक्टर टेस्ट फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबासमोर इन कॅमेरा करण्यात यावी, अशी मागणी तुरुंगात बंदिस्त असलेला महेंद्रसिंह विक्रमसिंह चौहाण याने लातूर जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधिशांकडे एका अर्जाव्दारे केली आहे. त्यातच दोन दिवसांपूर्वीच हा खटला सीआयडीकडून सीबीआयकडे वर्ग करण्यात आला आहे.
कायदेशीर बाबींना महत्व...
न्यायालयात सुरु असलेल्या एखाद्या प्रकरणात तुरुंगात असलेल्या बंदिवानास आपले म्हणणे मांडता येते. तो त्याचा अधिकार आहे. महेंद्रसिंह चौहाण याने केलेली नार्को टेस्टची मागणी कायद्याच्या चौकटीत आणि निकषात बसते का? ही मागणी कायदेशीर आहे का? याबाबत न्यायालय निर्णय घेईल. मात्र, अशी मागणी एखाद्या प्रकरणातील बंदिवानास करता येते, असे अ‍ॅड़ मोहनराव जाधव यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना सांगितले.

Web Title: The application for the petition filed by the judges in Kalpana Giri murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.