शिष्यवृत्तीसाठी केवळ पहिल्या वर्षीच अर्ज

By Admin | Published: September 18, 2015 01:00 AM2015-09-18T01:00:52+5:302015-09-18T01:00:52+5:30

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शासनाकडून शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रमाणपत्रासह अर्ज करणे अनिवार्य आहे.

Application for scholarship only in the first year | शिष्यवृत्तीसाठी केवळ पहिल्या वर्षीच अर्ज

शिष्यवृत्तीसाठी केवळ पहिल्या वर्षीच अर्ज

googlenewsNext

कॅफेतील विद्यार्थ्यांची गर्दी होणार लुप्त : संकेतस्थळाचाही होणार ताण कमी
खडसंगी : मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शासनाकडून शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रमाणपत्रासह अर्ज करणे अनिवार्य आहे. प्रत्येक वर्षाच्या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांना अर्ज करावा लागतो. आता विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी शिष्यवृत्ती अर्ज करण्याची गरज भासणार नाही. नविन सत्रापासून विद्यार्थ्यांना केवळ पहिल्या वर्षीच आॅनलाईन अर्ज सादर करावा लागणार आहे.
भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी २०१०-११ पासून आॅनलाईन शिष्यवृत्ती प्रणाली सुरू केली. मात्र विद्यार्थ्यांना अकरावीपासूनच आॅनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. यासाठी निश्चित कालावधीत हे अर्ज सादर केले जात असल्याने संकेतस्थळावर ताण वाढतो आणि तांत्रिक अडचणी निर्माण होतात. याबाबत अनेक पालक विद्यार्थ्यांचे अर्ज वेळेवर न भरल्याने तक्रारी वाढल्या होत्या. ही बाब लक्षात घेता समाजकल्याण विभागामार्फत नविन शैक्षणिक सत्रापासून काही शिष्यवृत्ती प्रणालीत सुधारणा करण्यात आल्या आहेत.
शिष्यवृत्ती प्रणालीतील तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी नविन सुधारणांमुळे विद्यार्थ्यांना केवळ पहिल्याच वर्षी शिष्यवृत्ती अर्ज आॅनलाईन पद्धतीने सादर करावा लागणार आहे. दुसऱ्या वर्षापासून संबंधीत महाविद्यालयामार्फत नुतनीकरण करण्यात येणार आहे. पदविका, पदवी, पदव्यूत्तर, पदव्यूत्तर पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षासाठी नव्याने आॅनलाईन अर्ज सादर करावे लागणार आहे. या नव्या सुधारणामुळे विद्यार्थ्यांचा कॅफेचा त्रास कमी होणार आहे. (वार्ताहर)

Web Title: Application for scholarship only in the first year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.