अकरावी प्रवेशासाठी आजपासूनच करा अर्ज; सुधारित वेळापत्रक जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2021 07:17 AM2021-08-14T07:17:37+5:302021-08-14T07:17:56+5:30

मुंबई हायकोर्टाच्या सूचनांप्रमाणे येत्या सहा आठवड्यांत प्रक्रिया पूर्ण करायची असल्याने  वेळापत्रकात बदल केला आहे. शनिवारपासून अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करता येतील.

Apply for Eleventh Admission from today; Revised schedule announced | अकरावी प्रवेशासाठी आजपासूनच करा अर्ज; सुधारित वेळापत्रक जाहीर

अकरावी प्रवेशासाठी आजपासूनच करा अर्ज; सुधारित वेळापत्रक जाहीर

Next

मुंबई : शिक्षण संचालनालयाने मुंबई महानगर क्षेत्र, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर या महापालिका क्षेत्रांसाठी अकरावी ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले. या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना १६ ऑगस्टऐवजी १४ ऑगस्टपासून ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेसाठी अर्ज भरता येतील. मुंबई हायकोर्टाच्या सूचनांप्रमाणे येत्या सहा आठवड्यांत प्रक्रिया पूर्ण करायची असल्याने  वेळापत्रकात बदल केला आहे. शनिवारपासून अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करता येतील.

राज्यात मुंबई महानगर क्षेत्र, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर या ५ ठिकाणांच्या प्रवेशप्रक्रिया केंद्रीय ऑनलाइन प्रवेश पद्धतीने होणार असून, उर्वरित महाराष्ट्रातील प्रवेश स्थानिक परिस्थितीनुसार प्रचलित पद्धतीने केले जाणार आहेत. यासंदर्भात संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक यांना सविस्तर सूचना देण्यात येतील, असे शिक्षण संचालक दत्तात्रेय जगताप यांनी स्पष्ट केले आहे.

पहिली फेरी २७ ते ३० ऑगस्ट
दुसरी फेरी ३१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर
तिसरी फेरी ५ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर
चौथी फेरी १२ ते १७ सप्टेंबर
इतर फेऱ्यांचे सविस्तर वेळापत्रक त्या त्या वेळी प्रदर्शित करण्यात येईल.

Web Title: Apply for Eleventh Admission from today; Revised schedule announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.