यंत्रमाग वीज ग्राहकांना एकसमान वीजदर लागू करा

By admin | Published: July 6, 2015 02:29 AM2015-07-06T02:29:15+5:302015-07-06T02:29:15+5:30

महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाच्या महावितरणने केलेली वीजदरातील कपात फसवी असून, ती छोट्या यंत्रमाग ग्राहकांचा खिसा कापणारी आहे, अशी टीका महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने केली आहे.

Apply power to the consumers of power generating power | यंत्रमाग वीज ग्राहकांना एकसमान वीजदर लागू करा

यंत्रमाग वीज ग्राहकांना एकसमान वीजदर लागू करा

Next

मुंबई : महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाच्या महावितरणने केलेली वीजदरातील कपात फसवी असून, ती छोट्या यंत्रमाग ग्राहकांचा खिसा कापणारी आहे, अशी टीका महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने केली आहे.
महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांच्या म्हणण्यानुसार, मोठ्या वीज ग्राहकांशी छोट्या यंत्रमागधारकांची तुलना केली असता छोट्या यंत्रमागधारकांवर पडणारा बोजा अधिक आहे. नव्या वीजदरांचा विचार करता २७ अश्वशक्तीपेक्षा कमी वीज वापरणाऱ्या ग्राहकांना ३७ पैसे प्रतियुनिट अशा रितीने वाढ झाली आहे. आणि २७ अश्वशक्तीपेक्षा अधिक वीज वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी १३ पैसे प्रतियुनिट असा दर कमी झाला आहे. शिवाय रात्रीच्या वीज वापरासाठीच्या दरातही कपात करण्यात आली आहे. रात्रीच्या वीज दरातील सवलत ही २.५० पैसे युनिटहून १.५० पैसे युनिट कमी करण्यात आली आहे. यंत्रमाग वीज ग्राहकांना एकसमान वीज दर लागू केले तर त्यांना दिलासा मिळेल. परिणामी, छोट्या यंत्रमागधारकांना चालना मिळून सरकारलाच त्याचा फायदा होईल. (प्रतिनिधी)

Web Title: Apply power to the consumers of power generating power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.