‘एक विद्यार्थी, एक झाड’ योजना राबवा

By admin | Published: April 4, 2015 04:21 AM2015-04-04T04:21:44+5:302015-04-04T04:21:44+5:30

देशातील सर्व विद्यापीठांमध्ये आणि विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी सहा महिने कालावधीचा पर्यावरण जागृतीवरील अभ्यासक्रम

Apply a 'Student, a tree' scheme | ‘एक विद्यार्थी, एक झाड’ योजना राबवा

‘एक विद्यार्थी, एक झाड’ योजना राबवा

Next

पुणे : देशातील सर्व विद्यापीठांमध्ये आणि विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी सहा महिने कालावधीचा पर्यावरण जागृतीवरील अभ्यासक्रम तयार करावा. त्याचप्रमाणे ‘एक विद्यार्थी, एक झाड ’ हा उपक्रम राबवावा, असे स्पष्ट निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) दिले आहेत.
भावी पिढीला निरोगी पर्यावरण मिळणे हा त्यांचा हक्क आहे. सर्वोच्च न्यायालयाने तसेच हरित लवादानेसुद्धा पर्यावरणरक्षणाबाबत स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. त्यामुळे राज्यातील सर्व विद्यापीठांनी राष्ट्रीय सेवा योजनाच्या माध्यमातून आणि इतर विभागांच्या मदतीने ‘एक विद्यार्थी, एक झाड’ हा उपक्रम राबवावा. विद्यार्थ्यांना वृक्षारोपणासाठी मोफत रोपे द्यावीत. त्याचप्रमाणे पर्यावरण जागृतीसाठी आवश्यक असलेले साहित्य उपलब्ध करून द्यावे, असे यूजीसीने म्हटले आहे.
पर्यावरण जनजागृती करणारा सहा महिन्यांचा अभ्यासक्रम सर्व विद्याशाखेमधील पदवीच्या विद्यार्थ्यांना शिकविणे बंधनकारक आहे. त्यामुळे विद्यापीठांनी हा अभ्यासक्रम तयार करून महाविद्यालयांना तो शिकविण्याबाबत सूचना द्याव्यात, असेही यूजीसीने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.

Web Title: Apply a 'Student, a tree' scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.