शासकीय कर्मचाऱ्यांना अपघात विमा योजना लागू
By Admin | Published: February 3, 2016 03:41 AM2016-02-03T03:41:58+5:302016-02-03T03:41:58+5:30
राज्यातील शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना अपघात विमा योजना लागू करण्याचा निर्णय वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे.
मुंबई : राज्यातील शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना अपघात विमा योजना लागू करण्याचा निर्णय वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे.
शासकीय कर्मचाऱ्यांचे मोटार अपघातात होणारे मृत्यू, येणारे कायमचे अपंगत्व पाहता कार्यरत अधिकारी/कर्मचारी यांना अल्प विमा दर आकारु न अपघात विम्याचे संरक्षण देण्यात येणार आहे. ही योजना १ एप्रिलपासून अमलात येईल. तीत अपघातामुळे आलेला मृत्यू,कायमचे अंपगत्व/विकलांगता आल्यास १०० टक्के लाभ मिळेल.
या अपघात योजनेची विमाछत्राची रक्कम गट - अ, गट - ब, गट-क व गट-ड या कर्मचाऱ्यांना रु पये १० लाख असून त्याची वार्षिक वगर्णी रु . ३०० + सेवाकर एवढी असेल. ही वर्गणी संबंधित कर्मचाऱ्यांच्या वेतन देयकातून वसूल करण्यात येईल. समूह अपघात विमा योजना आणि राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना-१९८२ या स्वतंत्र असतील.
सेवेत असताना सदस्याचा मृत्यू आल्यास गट विमा योजनेअंतर्गत देय विमा रकमेव्यतिरीक्त समूह वैयक्तिक अपघात विमा योजना रकमेचे प्रदान देय असेल. या योजनेच्या विमा रकमेचे प्रदान कर्मचाऱ्यांच्या वारसास घटनेच्या दिनांकापासून तीन महिन्यांच्या आत प्रदान करण्यात येईल.
अपघाती मृत्यूसमयी कर्मचाऱ्याविरुध्द कोणत्याही प्रकारची विभागीय चौकशी/न्यायालयीन प्रकरण प्रलंबित असेल किंवा शासकीय येणे बाकी असले तरी सदर अपघात विमा योजनेची रक्कम रोखण्यात येणार नाही. (विशेष प्रतिनिधी)