परिविक्षाधीन १३ उपअधीक्षकांना नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 06:13 IST2018-06-11T06:13:15+5:302018-06-11T06:13:15+5:30
राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून राज्य पोलीस दलात भरती झालेल्या १३ परिविक्षाधीन उपअधीक्षक/साहाय्यक आयुक्तांची विविध पोलीस घटकांमध्ये नियुक्ती करण्यात आलेली आहे.

परिविक्षाधीन १३ उपअधीक्षकांना नियुक्ती
मुंबई : राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून राज्य पोलीस दलात भरती झालेल्या १३ परिविक्षाधीन उपअधीक्षक/साहाय्यक आयुक्तांची विविध पोलीस घटकांमध्ये नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यात पाच तरुणींचा समावेश आहे. बहुतांश जणांना नक्षलग्रस्त भागात
नेमण्यात आले आहे. परिवेक्षणाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर
त्यांची पूर्णवेळ नियुक्ती केली जाणार आहे.
परिविक्षाधीन उपअधीक्षकांची नावे -(कंसात नियुक्तीचे ठिकाण) : पौर्णिमा टावरे (उमरेड, नागपूर), विशाल ढुमे (गडचिरोली), राकेश जाधव (सिरोंचा), विक्रांत गायकवाड (धानोरा), बजरंग देसाई (अहेरी), नंदा पराजे (मंगळूर पीर, वाशिम), राहुल धस (उमरगा, उस्मानाबाद), धनंजय पाटील (तुमसर, भंडारा), प्रशांत ढोले (देवरी, गोंदिया), अनुराधा गुरव (लांजा, रत्नागिरी), सोनाली कदम (गोंदिया), संदीप मिटके (अहमदनगर) व नयन पवनकुमार (रामटेक)