१८ परिविक्षाधीन उपअधीक्षकांच्या नियुक्त्या
By Admin | Published: June 27, 2016 05:33 AM2016-06-27T05:33:29+5:302016-06-27T05:33:29+5:30
राज्य पोलीस दलातील १८ परिविक्षाधीन उपअधीक्षक येत्या बुधवार (दि. २९) पासून प्रत्यक्ष सेवेत कार्यरत होणार आहेत.
मुंबई : राज्य पोलीस दलातील १८ परिविक्षाधीन उपअधीक्षक येत्या बुधवार (दि. २९) पासून प्रत्यक्ष सेवेत कार्यरत होणार आहेत. एक वर्षाच्या प्रात्यक्षिक प्रशिक्षणासाठी त्यांची विविध पोलीस घटकांमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबाबतचे आदेश गृहविभागाकडून नुकतेच जारी करण्यात आले आहेत.
१८ परिविक्षाधीन उपअधीक्षकांची नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये गेल्या वर्षभरापासून पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबत प्रशिक्षण सुरू होते. २८ जूनला त्याचा कालावधी पूर्ण होत आहे. त्यानंतर, वर्षभर त्यांना पोलीस कार्यपद्धतीचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण घेणे अनिवार्य आहे. ते पूर्ण केल्यानंतर त्यांची पूर्ण वेळ नियुक्ती केली जाणार आहे. अधिकाऱ्यांची नावे व नियुक्तीचे ठिकाण असे: प्रिया पाटील (अकोला), पौर्णिमा तावरे (धुळे), सोहेल शेख (जालना), विलास यामावार (पुणे ग्रामीण), बसवराज शिवपुजे (कोल्हापूर), शशिकांत भोसले (सातारा), रंजित पाटील (गडचिरोली), संतोष गायकवाड (जळगांव), किरणकुमार सूर्यवंशी (अमरावती ग्रामीण), प्रदीप मेराळे (औरंगाबाद ग्रामीण), सुनील जायभाये (रायगड), शैलेश काळे (पालघर), राजीव नवले (गोंदिया), तानाजी बरडे (अहमदनगर),अर्जुन भोसले, विक्रम कदम (नाशिक ग्रामीण), श्रीकांत डिसले (परभणी) व समीरसिंह साळवे (सोलापूर ग्रामीण). (प्रतिनिधी)