राज्यात २३ पोलीस उपअधीक्षकांची नियुक्ती
By admin | Published: July 17, 2015 12:57 AM2015-07-17T00:57:36+5:302015-07-17T00:57:36+5:30
राज्य पोलीस दलातील २३ पोलीस उपअधीक्षकांच्या विविध ठिकाणी नियमित स्वरुपात नियुक्या करण्यात आल्या आहेत. नेमणुकीचे आदेश बुधवारी सायंकाळी पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांनी दिले.
मुंबई : राज्य पोलीस दलातील २३ पोलीस उपअधीक्षकांच्या विविध ठिकाणी नियमित स्वरुपात नियुक्या करण्यात आल्या आहेत. नेमणुकीचे आदेश बुधवारी सायंकाळी पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांनी दिले. २३ पैकी १३ उपअधीक्षकांची गडचिरोली, भंडारा, गोदिया आदी नक्षलग्रस्त भागांमध्ये नियुक्ती करण्यात आली असून मुंबई शहरसाठी एक उपअधीक्षक मिळेल.
अधिकाऱ्यांची नावे आणि नियुक्तीचे ठिकाण : पकंज शिरसाट (मुंबई शहर), नवनाथ ढवळे (अभियान, गडचिरोली), सागर कवडे (गडचिरोली), गणेश बिरादार (मुख्यालय, गडचिरोली), विनायक नराळे (इचलकरंजी, कोल्हापूर), प्रशांत अमृतकर (बार्शी, सोलापूर), अण्णासाहेब जाधव (जिमालगट्टा, गडचिरोली), गणेश इंगळे (पेंढरी गडचिरोली), कृष्णात पिंगळे (तासगांव, सांगली), मंगेश चव्हाण (लातूर शहर), अभिजित फस्के (कुरखेडा, गडचिरोली),पद्मजा चव्हाण (नंदुरबार).
अजित टिके (गडचिरोली), नारायण शिरगांवकर (गंगाखेड,परभणी), नितीन जाधव (एटापल्ली,गडचिरोली), संदीप गावित (भामरागड, गडचिरोली), निता पडवी (पाटण, सातारा), सदाशिव वाघमारे (चोपडा, जळगांव), विकास नाईक (चाकूर,लातूर), सुधीर खिरडीकर (चंद्रपूर), दिपाली खन्ना (आमगांव, गोदिंया), प्रांजली सोनवणे (महाड, रायगड), डॉ. शीतल जानवे (साकोली,भंडारा).