डॉक्टरांची त्याच जिल्ह्यांत नियुक्ती

By admin | Published: January 14, 2017 11:59 PM2017-01-14T23:59:11+5:302017-01-14T23:59:11+5:30

नक्षलग्रस्त भागात सेवा देण्यास वैद्यकीय अधिकारी नाखुश असतात. अशा परिस्थितीत गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या पूर्व विदर्भातील चार नक्षलग्रस्त जिल्ह्यांमध्ये याच जिल्ह्यांतील

Appointment of doctors in the same districts | डॉक्टरांची त्याच जिल्ह्यांत नियुक्ती

डॉक्टरांची त्याच जिल्ह्यांत नियुक्ती

Next

- गोपाल लाजूरकर, गडचिरोली
नक्षलग्रस्त भागात सेवा देण्यास वैद्यकीय अधिकारी नाखुश असतात. अशा परिस्थितीत गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या पूर्व विदर्भातील चार नक्षलग्रस्त जिल्ह्यांमध्ये याच जिल्ह्यांतील सात वैद्यकीय अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.
पश्चिम विदर्भ, मराठवाडा, कोकण आदी भागांतील डॉक्टर या नक्षलग्रस्त जिल्ह्यांमध्ये येणे आवश्यक असताना बुधवारी सार्वजनिक आरोग्य विभागाने केलेल्या या बदल्या केल्या आहेत. भंडारा जिल्ह्यातील साकोली उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश नान्हे यांची बदली जिल्हा रुग्णालय भंडारा येथे करण्यात आली. भंडारा जिल्ह्यातीलच लाखांदूर तालुक्याच्या दिघोरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. अविनाश बोकडे यांची बदली जिल्हा रुग्णालय गडचिरोली येथे करण्यात आली. सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथील डॉ. आनंद ठिकरे यांची बदली गडचिरोली जिल्ह्याच्या आरमोरी तालुका आरोग्य अधिकारीपदी करण्यात आली.
चंद्रपूर जिल्ह्याच्या कोठारी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. राजेश भाविकदास रायपुरे यांची जिल्हा रुग्णालय गडचिरोली येथे बदली करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्याच्या घुग्घुस प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. प्रीती राजगोपाल
पिसारोडी यांची जिल्हा प्रशिक्षण पथक चंद्रपूर येथे बदली करण्यात आली. चंद्रपूर
जिल्ह्याच्या भद्रावती तालुक्यातील डोंगरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. जितेश कस्तुरे यांची
उपजिल्हा रुग्णालय मूल येथे बदली करण्यात आली. (प्रतिनिधी)

गोंदिया जिल्ह्यात एकाचीही बदली नाही
गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असल्या तरी गोंदिया जिल्ह्यात एकाही वैद्यकीय अधिकाऱ्याची बदली झालेली नाही.

Web Title: Appointment of doctors in the same districts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.