आपत्कालातील रुग्णवाहिकांसाठी नवीन सेवा कंत्राटदाराची नेमणूक लवकरच
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2023 05:54 AM2023-06-18T05:54:42+5:302023-06-18T05:55:08+5:30
या सेवेच्या कंत्राटदाराचा करार पुढील वर्षी जानेवारीत संपुष्टात येत आहे, त्यामुळे नवीन सेवा कंत्राटदाराच्या नेमणुकीसाठी निविदा प्रक्रियेच्या कामासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे.
मुंबई : राज्यात आपत्कालीन परिस्थितीमध्ये तातडीने वैद्यकीय मदत मिळावी, याकरिता अत्याधुनिक दळणवळण यंत्रणेसह वैद्यकीय उपकरणांनी सुसज्ज रुग्णवाहिका पुरविण्यात येतात. या सेवेच्या कंत्राटदाराचा करार पुढील वर्षी जानेवारीत संपुष्टात येत आहे, त्यामुळे नवीन सेवा कंत्राटदाराच्या नेमणुकीसाठी निविदा प्रक्रियेच्या कामासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे.
राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाद्वारे वित्त विभागाच्या अवर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील या समितीत १३ सदस्य आहेत. राज्यात विशेष करून ग्रामीण भागात आपत्कालीन परिस्थितीमध्ये रुग्णवाहिकेची गरज भासते असते. याकरिता सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत या रुग्णवाहिका पुरविल्या जातात.
यामध्ये २३३ ॲडव्हान्स लाइफ सपोर्टिंग आणि ७०४ बेसिस लाइफ सपोर्टिंग अशा एकूण ९३७ रुग्णवाहिकांची आपत्कालीन प्रतिसाद सेवा पाच वर्षांकरिता देण्यात आली होती. त्यासाठी संबंधित सेवा पुरवठादार कंत्राटदाराबरोबर करार करण्यात आला. सदर कराराची मुदत १ फेब्रुवारी २०१९ ते ३१ जानेवारी २०२४ पर्यंत या कालावधीकरिता होती. ही सेवा कंत्राटाची मुदत काही