एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरूपदी शशिकला वंजारी यांची नियुक्ती

By admin | Published: July 2, 2016 02:12 PM2016-07-02T14:12:53+5:302016-07-02T14:27:08+5:30

पनेचे शताब्दी वर्ष साजरे करीत असलेल्या श्रीमती नाथिबाई दामोदर ठाकरसी (एसएनडीटी) महिला विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. शशिकला वंजारी यांची नियुक्ती करण्यात आली

Appointment of Shankhi Vanjari, Vice Chancellor of SNDT Women's University | एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरूपदी शशिकला वंजारी यांची नियुक्ती

एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरूपदी शशिकला वंजारी यांची नियुक्ती

Next
>मुंबई : स्थापनेचे शताब्दी वर्ष साजरे करीत असलेल्या श्रीमती नाथिबाई दामोदर ठाकरसी (एसएनडीटी) महिला विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. शशिकला वंजारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती चे विद्यासागर राव यांनी आज ही घोषणा केली. 
डॉ. शशिकला वंजारी या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर शिक्षण विभाग येथे विभागप्रमुख व प्राध्यापिका आहेत. त्यांची नियुक्ती पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी करण्यात आली आहे. वसुधा कामत यांचा कार्यकाळ 13 मे रोजी संपल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ॰ संजय देशमुख कुलगुरूपदाचा अतिरिक्त कार्यभार पाहत होते.  
 डॉ. शशिकला वंजारी यांनी रा.तु.म. नागपूर विद्यापीठातून जीवरसायन शास्त्र विषयात एम.एससी., तसेच इंग्रजी व शिक्षणशास्त्र विषयात पदव्युत्तर पदव्या प्राप्त केल्या असून शिक्षण विषयात पी.एचडी. देखील प्राप्त केली आहे. त्यांना अध्यापन, प्रशासन तसेच संशोधनाचा व्यापक अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये त्यांचे अनेक शोध निबंध प्रसिद्ध झाले आहेत.
राज्यपालांनी एप्रिल महिन्यात राजस्थान उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त मुख्य न्यायाधीश न्या. जगदीश भल्ला यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठाच्या नव्या कुलगुरूच्या निवडीसाठी त्रिसदस्यीय निवड समिती गठीत केली होती. टाटा समाज विज्ञान संस्थेचे निदेशक डॉ एस परशुरामन व महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या सचिव वल्सा नायर या समितीचे सदस्य होते. समितीने शिफारस केलेल्या सर्व उमेदवारांच्या मुलाखती शुक्रवारी राजभवन येथे घेतल्यानंतर राज्यपालांनी आज डॉ. शशिकला वंजारी यांच्या कुलगुरूपदी निवडीची घोषणा केली.

Web Title: Appointment of Shankhi Vanjari, Vice Chancellor of SNDT Women's University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.