आण्णासाहेब पाटील महामंडळावरील नियुक्त्या रद्द, संभाजीराजे छत्रपती नाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2020 01:53 PM2020-11-10T13:53:28+5:302020-11-10T13:57:33+5:30
Sambhaji Raje Chhatrapati, Annasaheb Patil Mahamandal, kolhapur आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळावरील सर्व नियुक्त्या रद्द करण्याचा राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाविरोधात खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या निर्णयाबाबतचा अद्यादेश काढण्यात आला आहे.
कोल्हापूर : आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळावरील सर्व नियुक्त्या रद्द करण्याचा राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाविरोधात खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या निर्णयाबाबतचा अद्यादेश काढण्यात आला आहे.
महामंडळाने गेल्या दोन वर्षांत केलेल्या कामाची दखल घेऊन राज्यात नवीन सरकारने त्यांना एक वर्ष आणखी काम करण्याची संधी दिली. त्यानंतर या नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय आता घेतला.
ज्या अण्णासाहेब पाटलांनी मराठा समाजासाठी बलिदान दिले, त्यांच्या नावाने असलेल्या महामंडळाचे नेतृत्व त्यांचेच चिरंजीव सक्षमपणे करत असताना, ते महामंडळ बरखास्त का केलं? सरकारचा तो अधिकार असेलही, पण ही वेळ नव्हती. समाजात याबाबत अक्रोश निर्माण झाला आहे.
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) November 10, 2020
त्यावर संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विटरवर तीव्र प्रतिक्रिया दिला आहे. ते म्हणाले, ज्या अण्णासाहेब पाटलांनी मराठा समाजासाठी बलिदान दिले, त्यांच्या नावाने असलेल्या महामंडळाचे नेतृत्व त्यांचेच चिरंजीव सक्षमपणे करत असताना, ते महामंडळ बरखास्त का केलं? सरकारचा तो अधिकार असेलही, पण ही वेळ नव्हती. समाजात याबाबत अक्रोश निर्माण झाला आहे, अशा शब्दात संभाजीराजे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.