महामंडळांवरील नियुक्त्या आॅगस्टअखेर
By admin | Published: August 3, 2015 12:47 AM2015-08-03T00:47:32+5:302015-08-03T00:47:32+5:30
राज्यातील महामंडळांवरील नियुक्त्या काही कारणास्तव रखडल्या होत्या. त्या आता आॅगस्टअखेर करण्यात येणार असल्याची माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष
जालना : राज्यातील महामंडळांवरील नियुक्त्या काही कारणास्तव रखडल्या होत्या. त्या आता आॅगस्टअखेर करण्यात येणार असल्याची माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.
दानवे म्हणाले महामंडळांवरील नियुक्त्यांसाठी पक्षांतर्गत अनेक जण इच्छुक होते. घटक पक्षांच्या वाट्याचे सूत्रही ठरवायचे असल्याने त्या रखडल्या होत्या. मात्र हा घोळ संपला असून, आॅगस्टअखेर नियुक्त्या होतील.
२१ माजी आमदार आणि ७ विद्यमान आमदार भाजपाच्या संपर्कात आहेत. परंतु पक्षाश्रेष्ठींच्या आदेशानुसार सर्वांना एकाच वेळी पक्षप्रवेश न देता संबंधित नेत्याला त्यांच्या मतदारसंघात कार्यक्रमाद्वारे पक्षप्रवेश देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. जालना व वर्धा येथील ड्रायपोर्टबाबत मुंबईत नुकतीच बैठक झाली. केंद्राने जेएनपीटीला ९४ कोटी रुपयांचा निधी दिला. हा निधी जिल्हाधिकाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावा, अशी केंद्राची भूमिका आहे. तर जेएनपीटीने परस्पर भूसंपादन करण्याची भूमिका महसूल विभागाने घेतली आहे. (प्रतिनिधी)