निवडणुकीसंदर्भात नियुक्त्या रखडल्या

By admin | Published: January 17, 2017 02:00 AM2017-01-17T02:00:53+5:302017-01-17T02:00:53+5:30

सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नियुक्त्यांचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिल्यानंतर संबंधितांना रुजू करण्याचे काम प्रलंबित आहे.

Appointments for elections | निवडणुकीसंदर्भात नियुक्त्या रखडल्या

निवडणुकीसंदर्भात नियुक्त्या रखडल्या

Next


पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नियुक्त्यांचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिल्यानंतर संबंधितांना रुजू करण्याचे काम प्रलंबित आहे. आयुक्त दिनेश वाघमारे दिल्ली दौऱ्यावर असल्याने आरओची नियुक्तीसाठीची प्रक्रिया रखडली आहे.
महापालिका निवडणूक दि.२१ फेब्रुवारीला होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार विविध कक्षांची स्थापना, निवडणूक कार्यालये, मतमोजणी कार्यालये, निर्णय अधिकारी आणि कर्मचारी यांना रुजू करण्यांसदर्भात कार्यवाही सुरू झालेली आहे. शनिवारीच शहरातील ११ निवडणूक कार्यालये सज्ज झालेली आहेत. त्या ठिकाणच्या आरओची नियुक्ती विभागीय आयुक्तांनी केली आहे. त्यासंदर्भातील आदेशही विभागीय आयुक्तांनी शनिवारी दिले आहेत. त्यामुळे सोमवारी हे अधिकारी रुजू होतील, अशी अपेक्षा होती. मात्र, आयुक्त दिल्ली दौऱ्यावर असल्याने महापालिका स्तरावरील आदेश काढण्यात आलेले नाहीत, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
महापालिकेच्या निवडणूक विभागात आजअखेर सुमारे १५२ सीडींची, तर १३० छापील याद्यांची विक्री झाली असल्याचे डॉ. माने यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
>१८२ हरकती दाखल
राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांच्या सूचनेनुसार नागरिकांसाठी मतदार यादी प्रसिद्ध करून त्यावर हरकती मागविण्यात आल्या आहेत. त्यानुसार आजअखेर सुमारे १८२ नागरिकांच्या हरकती प्राप्त झाल्या आहेत. हरकती घेण्यासाठी दि. १७ जानेवारी २०१७ ही अंतिम तारीख असल्याची माहिती निवडणूक विभागाचे सहायक आयुक्त डॉ. यशवंत माने यांनी दिली.

Web Title: Appointments for elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.