सीआरझेड योजनेस मिळणार मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 05:54 AM2018-06-30T05:54:10+5:302018-06-30T05:54:25+5:30

मुंबई उपनगर, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये दीड महिन्यांत सागरी किनारा नियमन क्षेत्र (सीआरझेड) व्यवस्थापन योजनेस मंजुरी देण्याचे आश्वासन केंद्रीय पर्यावरणमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुक्रवारी दिले.

Approval of CRZ scheme | सीआरझेड योजनेस मिळणार मंजुरी

सीआरझेड योजनेस मिळणार मंजुरी

Next

नवी दिल्ली : मुंबई उपनगर, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये दीड महिन्यांत सागरी किनारा नियमन क्षेत्र (सीआरझेड) व्यवस्थापन योजनेस मंजुरी देण्याचे आश्वासन केंद्रीय पर्यावरणमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुक्रवारी दिले.
फडणवीस व डॉ. हर्षवर्धन यांच्या भेटीमध्ये राज्याच्या वने व पर्यावरण विभागाशी संबंधित विविध विषयांवर चर्चा झाली. सिंधुदुर्ग, रत्नागिरी व मुंबई उपनगरांसाठी सीआरझेड व्यवस्थापन नियोजन करण्याची मागणी यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली. झुडपी जंगलाच्या जमिनीवर राज्यातील गरीब जनतेस घरे बांधण्याची अनुमती देण्यासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने दिलेल्या परवानगीचा विषयही बैठकीत चर्चेस आला.
या बैठकीला पर्यावरण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी, डॉ. हर्षवर्धन यांचे खाजगी सचिव हार्दिक शाह, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, प्रधान सचिव तथा महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्तआभा शुक्ला उपस्थित होत्या.

Web Title: Approval of CRZ scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.