राज्यातील पाच तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्यास मंजुरी

By admin | Published: March 15, 2017 03:55 AM2017-03-15T03:55:09+5:302017-03-15T03:55:09+5:30

अमरावती जिल्ह्यातील श्रीसंत गुलाबराव महाराज जन्मस्थळ आणि भक्तिधाम, श्री क्षेत्र रिद्धपूर, कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र जोतिबा तीर्थक्षेत्र

Approval of the development plan of five pilgrim centers in the state | राज्यातील पाच तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्यास मंजुरी

राज्यातील पाच तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्यास मंजुरी

Next

मुंबई : अमरावती जिल्ह्यातील श्रीसंत गुलाबराव महाराज जन्मस्थळ आणि भक्तिधाम, श्री क्षेत्र रिद्धपूर, कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र जोतिबा तीर्थक्षेत्र देवस्थान, वाशिम जिल्ह्यातील श्रीसंत सखाराम महाराज देवस्थान या पाच तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्यास आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीने मंजुरी दिली. या आराखड्यात घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, बसस्थानक, जलपुनर्भरण आदी गोष्टींचा समावेश करावा, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्यांद्री अतिथीगृहावर वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार, राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील, आ.बच्चू कडू, आ.अमित झनक आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
अमरावती जिल्ह्यातील लोणी (ता. नांदगाव) येथील श्रीसंत गुलाबराव महाराज जन्मस्थळाच्या सोयीसुविधा व पायाभूत विकासासाठी ६.६९ कोटींच्या आराखड्यास मंजुरी देण्यात आली. त्यात भक्तनिवास संकुल, स्वच्छतागृह, बहुउद्देशीय सभागृह/सत्संग भवन, श्री संत गुलाबराव महाराज यांचे जन्म मंदिर व श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिराची सुधारणा व सुशोभिकरण, वाचनालय इमारत, पालखी मार्गाचे क्र ॉक्रि टीकरण आदींचा समावेश आहे.
श्रीसंत गुलाबराव महाराज यांचे कर्मभूमी असलेल्या चांदूरबाजार तालुक्यातील प्रल्हादपूर येथील भक्तिधाम परिसराच्या विकासासाठी २४.९९ कोटी रु पयांच्या आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये मुख्य मंदिर परिसराचे सुशोभीकरण, सांस्कृतिक भवन उभारणी, सायन्स सेंटर बांधणे, आर्ट गॅलरी, विश्रामगृह, जंतरमंतरच्या धर्तीवर बाग तसेच गौशाळा यांचा समावेश आहे.
तर अमरावतील जिल्ह्यातील श्री क्षेत्र रिद्धपूर या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी २५ कोटींचा आराखडा मंजूर केला आहे. यामध्ये सिमेंटचे रस्ते व नाले, स्वच्छता गृह, थिम पार्क आदींचा समावेश आहे. प्रस्तावित
थिम पार्कमध्ये सभागृह, बाग, पार्किंगची सोय, डायनिंग हॉल, बोटींगची सोय, बाजारतळ आदींचा समावेश आहे.
तर वाशिम जिल्ह्यातील लोणी (ता. रिसोड) येथील श्रीसंत सखाराम महाराज संस्थान तीर्थक्षेत्र विकासासाठी २० कोटींच्या आराखड्यात मंदिराकडे जाणारे रस्ते, पालखी मार्ग यांची कामे, रस्त्याच्या कडील गावातील गटारींचे बांधकाम, सांडपाणी व्यवस्थापन, मंदिर परिसर व रस्त्यावर वीजेची सोय, भक्त निवास, प्रसाद साहित्य विक्रीसाठी दुकानांची उभारणी आदी कामे तसेच गावातील इतर रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत. तसेच शौचालयाचे बांधकाम, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाणार आहे. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Approval of the development plan of five pilgrim centers in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.