डॉक्टर भरतीच्या ठरावाला मंजुरी
By admin | Published: July 2, 2016 02:03 AM2016-07-02T02:03:41+5:302016-07-02T02:03:41+5:30
महापालिकेचे शहर अभियंता म्हणून अंबादास चव्हाण आणि सह शहर अभियंता आयुबखान पठाण यांना तात्पुरता पदभार देण्यात आला होता.
पिंपरी : महापालिकेचे शहर अभियंता म्हणून अंबादास चव्हाण आणि सह शहर अभियंता आयुबखान पठाण यांना तात्पुरता पदभार देण्यात आला होता. या दोघांच्या बढतीच्या ठरावासह पाच विषयांना विधी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. वैद्यकीय विभागासाठी असणाऱ्या डॉक्टर भरतीचाही ठराव मंजूर करण्यात आला.
विधी समिती सभेच्या अध्यक्षस्थानी नंदा ताकवणे होत्या. या वेळी सदस्य भाऊसाहेब भोईर, आर. एस. कुमार, नीलेश पांढरकर, भारती फरांदे, नीता पाडाळे, सुरेश म्हेत्रे, शशिकला कुटे आदी उपस्थित होते. विषय पत्रिकेवर तीन विषय होते. त्यात पालिकेच्या आस्थापनावर अस्थिरोगतज्ज्ञ पद नियुक्तीस मान्यता दिली. अस्थिरोगतज्ज्ञ नियुक्तीचा ठराव करून सर्वसाधारण सभेकडे मान्यतेसाठी पाठविण्याचा निर्णय झाला. तसेच सर्जन व ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारीपदाची १६ पदे पदोन्नतीने भरावीत, या ठरावास मंजुरी दिली. तसेच डॉ. सुहास माटे, डॉ. विजया आंबेडकर, डॉ. मीनाश्री पाटील
यांना ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारीपदावर पदोन्नती विषयास मान्यता
देण्यात आली. (प्रतिनिधी)
शहर अभियंता महावीर कांबळे हे निवृत्त झाल्याने त्यांच्या जागेवर राज्य शासनाकडून अधिकारी आणण्याचे प्रयत्न सुरू असताना अंबादास चव्हाण यांना तात्पुरता पदभार दिला होता. तसेच सह शहर अभियंता म्हणून आयुबखान पठाण यांना तात्पुरात पदभार दिला होता. पदोन्नतीने बढती देण्याचा विषय सभेसमोर चर्चिला गेला.