राज्यातील विनाअनुदानित शाळांना २० टक्के वेतन अनुदान देण्यास मंजुरी
By Admin | Published: June 14, 2016 07:50 PM2016-06-14T19:50:33+5:302016-06-14T19:53:40+5:30
१९ हजार २४७ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना २० टक्के वेतन अनुदान देण्यास आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत तत्त्वत: मान्यता देण्यात आली.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 14 - मूल्यांकनाच्या निकषानुसार अनुदानास पात्र ठरलेल्या राज्यातील १६२८ शाळा व २४५२ तुकड्यांमधील १९ हजार २४७ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना २० टक्के वेतन अनुदान देण्यास आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत तत्त्वत: मान्यता देण्यात आली.
राज्यातील विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, अशी भूमिका शासनाने अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडली होती.
राज्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याबरोबरच विनाअनुदानित शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून अनुदान देण्यात येणार आहे. त्यानुसार २० टक्के वेतन अनुदान देण्यास तत्त्वतः मान्यता दिली आहे. या अनुदानापोटी १६३.२१ कोटी रुपयांचा भार राज्य शासनावर पडणार आहे.