सागरी मार्गाला हेरिटेज समितीची मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2016 12:53 AM2016-10-30T00:53:05+5:302016-10-30T00:53:05+5:30

अनंत अडचणी पार करत तयार होत असलेल्या सागरी मार्गाच्या वाटेतील मोठा अडथळा दूर झाला आहे. एनसीपीएऐवजी प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपुल येथून सागरी मार्गाची सुरुवात

The approval of the Heritage Committee by the sea route | सागरी मार्गाला हेरिटेज समितीची मान्यता

सागरी मार्गाला हेरिटेज समितीची मान्यता

Next

मुंबई : अनंत अडचणी पार करत तयार होत असलेल्या सागरी मार्गाच्या वाटेतील मोठा अडथळा दूर झाला आहे. एनसीपीएऐवजी प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपुल येथून सागरी मार्गाची सुरुवात करण्याच्या महापालिकेच्या सुधारित प्रस्तावाला मुंबई पुरातन वास्तू संवर्धन समितीने मंजुरी दिली आहे. त्यामुळे भाजपाचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प निवडणुकीपुर्वी मार्गी लागण्याची चिन्हे आहेत.
नरीमन पॉर्इंट ते कांदिवली असा ३३ किलोमीटर लांबीचा सागरी मार्ग बांधण्यात येणार आहे. मात्र यासाठी नरीमन पॉर्इंट येथे बोगदा खणण्यात येणार असल्याने हा बोगदा व पुलामुळे मरीन ड्राईव्हचे सौंदर्य बाधित होईल, असा आक्षेप पुरातन वास्तू समितीने घेतला होता. मात्र भाजपाचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प असल्याने निवडणुकीपूर्वी तो मार्गी लागण्यासाठी पालिका प्रशासनावर दबाव असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मरीन ड्राईव्हच्या धक्क्याला कोणत्याही स्वरुपाची हानी न होता हा प्रकल्प पुढे नेण्यात येईल, अशी ग्वाही प्रशासनाने दिली आहे.
या प्रकल्पाचा सुधारित प्रस्ताव कार्यकारी अभियंता (सागरी मार्ग ) यांनी ना हरकत प्रमाणपत्रासाठी पुरातन वास्तू समितीकडे पाठवला होता. यामध्ये सुधारित प्रस्तावामुळे एनसीपीएऐवजी प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल येथून सागरी मार्ग नेल्यास येथील अरुंद मार्ग मोकळा होईल. तसेच मरीन ड्राईव्हच्या धक्क्याची रूंदी अबाधित राहील, असा दावा महापालिकेने केला आहे. त्यामुळे पुरातन वास्तू समितीने या प्रकल्पाला अखेर मंजुरी दिली आहे.
भाजपाचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून महापालिकेच्या आगामी निवडणुकीपूर्वी या सेतूचा श्रीगणेशा करण्यासाठी भाजपाची धावपळ सुरु आहे. (प्रतिनिधी)

अखेर मार्गात बदल
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पामुळे सागरी मार्गाची सुरुवात एनसीपीए येथून करण्यात येणार होती. मात्र हा प्रकल्प वेग घेत नसल्याने अखेर हा बदल करण्यात आला आहे. मात्र मरीन ड्राइव्हच व्यूह खराब होणार नाही. याची काळजी घेण्यास पुरातन समितीने बजावले आहे.

आता एकच अडथळा
पुरातन वास्तु समितीच्या परवानगीमुळे या प्रकल्पातील एक मोठा अडथळा दूर झाला आहे. आता केवळ सागरी नियंत्रण क्षेत्राची परवानगी केंद्राकडून येणे बाकी आहे. त्यानंतर या प्रकल्पावर प्रत्येक्षात काम सुरु होईल.

बदलास प्रशासनाची तयारी
मुंबई पोलीस जिमखाना येथील या बोगद्यामुळे मरीन ड्राईव्हच्या सौंदर्यात बाधा येत असल्याचा दुसरा आक्षेप समितीने घेतला होता. मात्र हाजी अली दर्गा आणि मरीन ड्राईव्हच्या सौंदर्यात बाधा येत असल्यास या प्रकल्पामध्ये बदल करण्याची तयारी प्रशासनाने दाखविली आहे.

Web Title: The approval of the Heritage Committee by the sea route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.