एनटीपीसीच्या निधीतून पीसीसीपी पाईपलाईन टाकण्यास मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2016 10:08 PM2016-09-02T22:08:52+5:302016-09-02T22:08:52+5:30

एनटीपीसीच्या निधीतून उजनी ते सोलापूर अशा जलवाहिनीसाठी ८१ किलोमीटर अंतरात पीसीसीपी (प्रीस्टेटेड कॉन्ट्रॅक्ट सिमेंट पाईप) पाईप वापरण्यास शुक्रवारी मनपाच्या पदाधिकाºयांनी मान्यता दिली.

Approval of the PCCP pipeline from NTPC funding | एनटीपीसीच्या निधीतून पीसीसीपी पाईपलाईन टाकण्यास मंजुरी

एनटीपीसीच्या निधीतून पीसीसीपी पाईपलाईन टाकण्यास मंजुरी

Next
>- ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 2 - एनटीपीसीच्या निधीतून उजनी ते सोलापूर अशा जलवाहिनीसाठी ८१ किलोमीटर अंतरात पीसीसीपी (प्रीस्टेटेड कॉन्ट्रॅक्ट सिमेंट पाईप) पाईप वापरण्यास शुक्रवारी मनपाच्या पदाधिकाºयांनी मान्यता दिली. 
 
एनटीपीसीकडून दिल्या जाणाºया निधीतून २५१ कोटी ७६ लाख खर्चाची ७५ एमएलडीची उजनी ते सोलापूर अशी जलवाहिनी टाकण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने (एमजेपी) तयार केला आहे. या प्रस्तावावर गेल्या आठवड्यात विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी महापालिका आयुक्त विजयकुमार काळम, महापौर सुशीला आबुटे, उपमहापौर प्रवीण डोंगरे यांच्या उपस्थितीत व्हिडीओ कॉन्फरन्स घेतली. यावेळी उपमहापौर डोंगरे यांनी पाईपच्या अनुषंगाने काही मुद्दे उपस्थित केले. त्यावेळी एमजेपीच्या अधिकाºयांनी पहिल्या टप्प्यात २८.५ किलोमीटर डीआय पाईप वापरला जाईल. उर्वरित ठिकाणी म्हणजे खंडाळी ते सोरेगाव या ८१.५0 किलोमीटर अंतरात पीसीसीपी वापरले जाणार आहेत. पीसीसीपी पाईपबाबत उपमहापौर डोंगरे यांनी अडचणी मांडल्या होत्या. 
 
त्यावर पुणे इंजिनिअरिंग कॉलेजचे प्रा. भालचंद्र बिराजदार हे या पाईपची तांत्रिक माहिती देण्यासाठी आज महापालिकेत आले होते. यावेळी महापौर सुशीला आबुटे, उपमहापौर प्रवीण डोंगरे, सभागृह नेते संजय हेमगड्डी, विरोधी पक्षनेते नरेंद्र काळे, नगरसेवक आनंद चंदनशिवे व आयुक्त विजयकुमार काळम, सार्वजनिक आरोग्य अभियंता मुकुंद भालेराव, उपअभियंता संजय धनशेट्टी आदी उपस्थित होते. प्रा. बिराजदार माहिती देताना म्हणाले की, सुरुवातीला हा प्रस्ताव ३00 कोटींचा होता. पण एनटीपीसीकडून २५0 कोटी मिळणार असल्याने त्या अनुषंगाने विचार करून पाईप निवडले आहेत. खंडाळीपासून ग्रॅव्हीटीने पाणी जाणार आहे. त्यामुळे पीसीसीपी पाईपचे बजेट कमी असून, ५0 वर्षे टिकतील. यात १.६ मि.मी.चा लोखंडी पाईप, त्यावर दोन इंच हायस्ट्रेन्थ क्राँकीट असेल, त्यावर ४ मि.मी.ची एक सळई रिंगपद्धतीने गुंडाळलेली असेल व त्यावर २0 मि.मी. चे पुन्हा काँक्रीट कव्हर असते. यामुळे पाईपची जाडी ८0 ते ९0 मि.मी. पर्यंत जाते. सरळ जलवाहिनी टाकण्यासाठी हे पाईप उपयुक्त व ५0 वर्षे टिकाऊ आहेत. रिंग टाकून वेल्डिंगद्वारे जोड दिल्याने धोका होत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 
 
छिद्र पाडताना धोका 
पीसीसीपी पाईपला मधूनच छिद्र पाडता येत नाही. असे केल्यास जलवाहिनीच फुटते. त्यामुळे पाणीचोरीचा धोका कमी आहे. याशिवाय पाईपचे वजन जास्त असल्याने धक्क्याने हलत नाहीत. त्यामुळे जोडमधून लिकेज होण्याचे प्रमाण कमी आहे. पदाधिकाºयांनी विचारलेल्या शंकाचे निरसन केल्यावर सर्वांनी या पाईपला मान्यता दिली.
 

Web Title: Approval of the PCCP pipeline from NTPC funding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.