प्रकल्प अहवाल निविदेला मंजुरी

By admin | Published: May 20, 2016 01:42 AM2016-05-20T01:42:39+5:302016-05-20T01:42:39+5:30

उच्च क्षमता द्रुतगती मार्गाचा (एचसीएमटीआर) प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठीच्या ९० लाख रुपये खर्चाच्या कामाला स्थायी समितीने मंगळवारच्या बैठकीत मंजुरी दिली.

Approval of project report | प्रकल्प अहवाल निविदेला मंजुरी

प्रकल्प अहवाल निविदेला मंजुरी

Next


पुणे : शहरातील वाहतुकीची कोंडी कमी व्हावी यासाठी तब्बल १८ वर्षांपूर्वी प्रस्तावित केलेल्या उच्च क्षमता द्रुतगती मार्गाचा (एचसीएमटीआर) प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठीच्या ९० लाख रुपये खर्चाच्या कामाला स्थायी समितीने मंगळवारच्या बैठकीत मंजुरी दिली.
मुंबईस्थित स्तुप कन्सल्टंट या कंपनीला हे काम देण्यात आले आहे. येत्या ४ महिन्यांत त्यांनी ते पूर्ण करायचे असून, त्यानंतर अनेक वर्षे रेंगाळलेल्या या रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाला गती मिळणे अपेक्षित आहे. माजी उपमहापौर, नगरसेवक आबा बागुल यांनी ही माहिती दिली.
एकूण ३५ किलोमीटर अंतराचा हा मार्ग महापालिकेच्या १७ पेठांमधून जातो. बोपोडी, औंध, भांबुर्डा, एरंडवणा, कोथरूड, हिंगणे, सदाशिव पेठ, पर्वती, वानवडी, हडपसर, मुंढवा, वडगाव शेरी, लोहगाव, येरवडा, धानोरी व कळस असा हा भाग आहे. यातील कळस व धानोरी या भागातील रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. लोहगाव येथे अंशत: काम झाले आहे. औंध व येरवडा येथे हा संपूर्ण रस्ता सरकारी जागेतून जातो, त्यामुळे ती जागा संपादन करण्यासाठी सरकारकडे प्रस्ताव दिला आहे. अन्य ठिकाणच्या जागांची मोजणी बाकी असून, त्याचाच प्रकल्प अहवाल स्तूप कंपनीने करायचा आहे.
या रस्त्याच्या कामाला गती मिळावी यासाठी बागुल यांच्या प्रयत्नांमधून महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी त्यासाठी महापालिकेत स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे.
रस्त्यासाठीची जागा संपादन करण्यात सातत्याने अनेक अडचणी येत आहेत व महापालिका त्याकडे लक्ष द्यायला तयार नाही असे बागुल म्हणाले. प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम व्यावसायिक कंपनीला दिल्याने आता भूसंपादनातील सर्व अडचणी समोर येतील तसेच भविष्यातील वाहतुकीचा अंदाज घेऊन रस्त्याचे डिझाईन तयार होईल असा विश्वास बागूल यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)
>अंतर ३५ किलोमीटर
एकूण ३५ किलोमीटर अंतराचा हा मार्ग महापालिकेच्या १७ पेठांमधून जातो. बोपोडी, औंध, भांबुर्डा, एरंडवणा, कोथरूड, हिंगणे, सदाशिव पेठ, पर्वती, वानवडी, हडपसर, मुंढवा, वडगाव शेरी, लोहगाव, येरवडा, धानोरी व कळस असा हा भाग आहे.

Web Title: Approval of project report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.