कोल्हापुरात नवीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु करण्यास मान्यता, चंद्रकांत पाटलांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2023 07:50 PM2023-03-17T19:50:33+5:302023-03-17T19:50:56+5:30

नवीन अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु करण्याकरीता एकूण रु.२२१.४८ कोटी इतक्या खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील सांगितले.

Approval to start a new government engineering college in Kolhapur, Chandrakant Patil's information | कोल्हापुरात नवीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु करण्यास मान्यता, चंद्रकांत पाटलांची माहिती

कोल्हापुरात नवीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु करण्यास मान्यता, चंद्रकांत पाटलांची माहिती

googlenewsNext

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून कोल्हापूर येथे ३०० प्रवेश क्षमतेचे नवीन अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु करण्यास उच्च व तंत्र शिक्षण विभागाने सादर केलेल्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

कोल्हापूर येथे नवीन अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु करण्याकरीता टप्प्या टप्प्याने एकूण ६५ शिक्षकीय व ५० शिक्षेकत्तर अशा एकूण ११५ पदे मंजूर करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. तसेच नवीन अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु करण्याकरीता एकूण रु.२२१.४८ कोटी इतक्या खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील सांगितले.

याचबरोबर, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ऑटोमोबाईल, ऑटोमेशन, टेलिकम्युनिकेशन, उर्जानिर्मिती इत्यादी क्षेत्रांमध्ये मोठया प्रमाणात झालेला औद्योगिक विस्तार तसेच सूत गिरणी, साखर कारखाने, कापड गिरण्या, फाऊंड्री, मशिन शॉप इत्यादींचा औद्योगिक विस्तारातील सहभाग लक्षात घेता, कोल्हापूर जिल्हयामध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची आवश्यकता होती, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.

याशिवाय, यामध्ये आर्टिफिशिअल इंटिलिजन्स अॅन्ड डाटा सायन्स, मेकॅनिकल अॅन्ड ऑटोमेशन इंजिनिअरींग,कॉम्प्युटर सायन्स अॅन्ड इंजिनिअरींग, इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग ही अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत, असेही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Approval to start a new government engineering college in Kolhapur, Chandrakant Patil's information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.