शून्य टक्के निकालाच्या दोन शाळांची मान्यता रद्द
By Admin | Published: June 7, 2016 07:15 AM2016-06-07T07:15:51+5:302016-06-07T07:30:10+5:30
लातूर : एकूण शाळांपैकी १०० टक्के निकालाच्या १२८ शाळा आहेत. तर शून्य टक्के निकालाच्या १६ शाळा आहेत. सतत दोनवेळा शून्य टक्के निकाल लागलेल्या दोन शाळांची मान्यता रद्द करण्यात आली आहे.
लातूर : एकूण शाळांपैकी १०० टक्के निकालाच्या १२८ शाळा आहेत. तर शून्य टक्के निकालाच्या १६ शाळा आहेत. सतत दोनवेळा शून्य टक्के निकाल लागलेल्या दोन शाळांची मान्यता रद्द करण्यात आली आहे.
लातूर विभागीय मंडळाअंतर्गत असलेल्या तीन जिल्ह्यांत १६९८ मान्यताप्राप्त माध्यमिक शाळा आहेत. पैकी नांदेड जिल्ह्यात ६४५, उस्मानाबाद जिल्ह्यात ४२२, लातूर जिल्ह्यात ६३१ शाळांचा समावेश आहे. यंदाच्या दहावी परीक्षेत शून्य ते १० टक्के निकालाच्या ४, १० ते २० टक्क्यांच्या ६, २० ते ३० टक्क्यांच्या १९, ३० ते ४० टक्क्यांच्या ३६, ४० ते ५० टक्क्यांच्या ९१, ५० ते ६० टक्क्यांच्या १११, ६० ते ७० टक्क्यांच्या १८१, ७० ते ८० टक्क्यांच्या २९२, ८० ते ९० टक्क्यांच्या ३९६, ९० ते ९९ टक्क्यांच्या ४१८ तर शंभर टक्क्यांच्या १२८ अशा एकूण १६९८ माध्यमिक शाळांच्या निकालाची टक्केवारी आहे.
सतत दोनवेळा शून्य टक्के निकाल लागलेल्या दोन शाळांची मान्यता काढून घेण्याची म्हणजेच रद्द करण्याची कारवाई विभागीय उपसंचालक कार्यालयाकडून करण्यात आल्याचे उपसंचालक खांडके म्हणाले.
कमी निकाल लागलेल्या सर्व शाळांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात येणार असून, ० ते ३० टक्के निकालाच्या शाळांना सुधारण्याची एक संधी दिली जाणार आहे. शिवाय, त्या शाळांतील शिक्षकांचे प्रशिक्षणही घेतले जाणार आहे.