प्राथमिक शिक्षक महासंघाच्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी एका आठवड्याची रजा मंजूर 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2020 07:19 PM2020-03-04T19:19:35+5:302020-03-04T19:27:55+5:30

प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या मागील काळात ठरल्या होत्या वादग्रस्त

Approves one week leave for Teacher's convention | प्राथमिक शिक्षक महासंघाच्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी एका आठवड्याची रजा मंजूर 

प्राथमिक शिक्षक महासंघाच्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी एका आठवड्याची रजा मंजूर 

Next
ठळक मुद्देअलिबाग येथील अधिवेशनाला उध्दव ठाकरे,शरद पवार यांची उपस्थिती  महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ ही राज्यातील प्रमुख संघटना

बारामती : प्राथमिक शिक्षक महासंघाच्या १३ मार्च रोजी अलिबाग येथे होणाऱ्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी राज्य शासनाने  ९ ते १४  मार्च अशी आठवडाभराची अधिवेशन रजा राज्यातील शिक्षकांना मंजूर केली आहे. यावर्षी प्रथमच राष्ट्रीय स्तरावरील अधिवेशन घेण्यात येत आहे. या अधिवेशनासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार आहेत,अशी माहिती शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी दिली.

प्राथमिक शिक्षक महासंघाच्या अधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित राहणार आहेत.तसेच अधिवेशनासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, यांच्यासह सुप्रिया सुळे, अब्दुल सत्तार, बच्चू कडू, प्राजक्त तनपुरे हे मंत्री उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ ही राज्यातील प्रमुख संघटना आहे.             
शिक्षक संघाचे अधिवेशन राष्ट्रीय स्तरावरील असल्याने यावेळी राज्य शासनाने तीन दिवसांऐवजी ९ मार्च ते १४ मार्च अशी सहा दिवसांची अधिवेशन रजा मंजूर केलेली आहे ,याबाबतचे ग्रामविकास मंत्रालयाने परिपत्रकाद्वारे सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत,अशी  माहिती सरचिटणीस खंडेराव ढोबळे यांनी दिली
प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या मागील काळात वादग्रस्त ठरल्या होत्या.परतालुक्यात गेलेल्या शिक्षकांच्या मूळ तालुक्यात बदल्या करण्याची शिक्षक संघाची मागणी आहे. अधिवेशनातील  घोषणेकडे शिक्षकांचे लक्ष लागले आहे.
————————————
शिक्षकांच्या मागण्या
  प्राथमिक शिक्षकांना १०,२०,३० ही  आश्वाशित प्रगती योजना ,  वैद्यकीय उपचारासाठी कॅशलेस सुविधा, संगणक प्रशिक्षण अट शिथिल करणे, जुनी पेन्शन योजना, शाळांसाठी मोफत वीज पुरवठा, वस्तीशाळा शिक्षकांची सलग सेवा , बी एल ओ च्या कामातून वगळणे या मागण्या अधिवेशनात मांडण्यात येणार आहेत.

Web Title: Approves one week leave for Teacher's convention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.