रुग्णांच्या नावाखाली मनमानी!
By Admin | Published: February 25, 2015 02:20 AM2015-02-25T02:20:14+5:302015-02-25T02:20:14+5:30
सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण आणि मुंबई महानगरपालिका या तीन संस्था गोरगरीब रुग्णांच्या नावावर औषध खरेदीत मनमानी करत आहेत.
अतुल कुलकर्णी, मुंबई
सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण आणि मुंबई महानगरपालिका या तीन संस्था गोरगरीब रुग्णांच्या नावावर औषध खरेदीत मनमानी करत आहेत. औषधासाठीचे त्यांचे निकषही वेगवेगळे आहेत.
माजी आरोग्य मंत्री विजयकुमार गावित यांनी सरकारी रुग्णालयांच्या परिसरातच खासगी दुकाने उघडण्यास परवानगी दिली. औषध खरेदीतील अक्षम्य दिरंगाईमुळे शासकीय रुग्णालयात औषधांचा तुटवडा पडत असे. त्यामुळे या खासगी दुकानदारांचा फायदा झाला. नो प्रिस्कीप्शन पॉलिसीनुसार शासनाच्या दवाखान्यात औषधे नसतील तर ती बाहेरुन खरेदी करुन दिली पाहिजेत, असे धोरण असताना गोरगरिबांना मात्र प्रिस्कीप्शन देऊन बाहेरून औषधे खरेदी करण्यास सांगितले जाते.
रुग्णांची हेळसांड टाळण्यासाठी सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण आणि महापालिका रुग्णालयातील औषध खरेदी एकाच ठिकाणी व्हायला हवी, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांना वाटते.