चित्रपट चालतो तेव्हा तो पाहणारे केवळ पुरुष असतात का? तापसी पन्नू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 04:51 PM2019-07-23T16:51:22+5:302019-07-23T16:53:42+5:30
आजही अभिनेता आणि अभिनेत्री यांच्या मानधनामध्ये खूप तफावत आहे.
पुणे : 'चित्रपट चालतो तेव्हा तो पाहणारे केवळ पुरुष असतात का? कोणताही मनुष्य परिपूर्ण नसतो. नकारात्मक भूमिका दाखवणे वाईट नाही. मीही अनेक चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिका केल्या आहेत. मात्र, नकारात्मकतेचे उदात्तीकरण चुकीचे आहे. या मानसिकतेला मी माझ्या चित्रपटातून नक्की प्रत्युत्तर देईन. मी हार मानणार नाही', अशा शब्दांत तापसी पन्नू हिने परखड मत मांडले. हिरोला जेंडर नसते. हिरो म्हणजे आदर्श. हा आदर्श स्त्रीही असू शकते, हे तिने अधोरेखित केले.
लोकमत वूमन समिटच्या आठव्या पर्वामध्ये अभिनेत्री तापसीला लोकमत उमंग पुरस्काराने गौरवण्यात आले. यावेळी 'तेजस्विनी' या विषयावर आधारीत परिसंवादात ती लोकमत एडिटोरियल बोर्डाचे अध्यक्ष विजय दर्डा यांच्यासह सहभागी झाली होती.
तापसी म्हणाली, आजही अभिनेता आणि अभिनेत्री यांच्या मानधनामध्ये खूप तफावत आहे. अभिनेत्याचे नाव पाहूनच पिक्चर चालतो, अभिनेत्रीचा चित्रपट मात्र आशय चांगला असेल तरच चालतो. बदल एका रात्रीत घडत नाही. मात्र, चित्रपटसृष्टीत बदल घडायला सुरुवात झाली आहे, हेही नसे थोडके.
'संघर्ष प्रत्येकाला करावा लागतो. विशेषतः प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याचा प्रयत्न केला तर जास्त विरोध होतो. असा विरोध झाला तरी हृ नका, निराश होऊ नका, असा मौलिक सल्ला तिने महिलांना दिला.