परवानगीपूर्वीच बदलले सदनिकांचे क्षेत्रफळ; प्रकाश मेहतांची साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 04:34 AM2017-08-03T04:34:08+5:302017-08-03T04:34:23+5:30

गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहतांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत असलेल्या ताडदेवच्या एमपी मिल कंपाउंड झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात बिल्डरने वाढीव चटईक्षेत्र निर्देशांक (एफएसआय) लाटण्यासाठी परवानगी मिळण्याआधीच...

Area of ​​changed tents before permission; With Prakash Mehta | परवानगीपूर्वीच बदलले सदनिकांचे क्षेत्रफळ; प्रकाश मेहतांची साथ

परवानगीपूर्वीच बदलले सदनिकांचे क्षेत्रफळ; प्रकाश मेहतांची साथ

Next

मुंबई : गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहतांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत असलेल्या ताडदेवच्या एमपी मिल कंपाउंड झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात बिल्डरने वाढीव चटईक्षेत्र निर्देशांक (एफएसआय) लाटण्यासाठी परवानगी मिळण्याआधीच बी-२-डी (सिंहगड) या इमारतीमधील सहा मजल्यांवरील १२ सदनिकांच्या बांधकामात बदल केल्याचा प्रकार ‘लोकमत’च्या निदर्शनास आला आहे. त्यामुळे जणूकाही मेहता यांच्याकडून या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची खात्रीच बिल्डरला होती, असा संशय आता व्यक्त होत आहे.
‘लोकमत’ने प्रत्यक्ष या वादग्रस्त ‘एसआरए’ प्रकल्पाला भेट दिली असता, हा प्रकार उघडकीस आला आहे. एमपी मिल कंपाउंडमधील ‘सिंहगड’ या नावाने ओळखल्या जाणाºया बी-२-डी इमारतीच्या पहिल्या सहा मजल्यांवरील प्रत्येकी दोन सदनिकांच्या बांधकामात बदल करून २२५ चौरस फुटांवरून २६९ चौरस फुटांपर्यंत वाढवण्यात आल्या आहेत. मुळात परवानगी नसतानाही, बिल्डरने येथील गृहनिर्माण संस्थेतील पदाधिकाºयांना हाताशी धरून हा प्रकार केल्याचा आरोप शिव संकल्प जनजागृती मंचाने केला आहे.
मंचाचे सदस्य एकनाथ घाडगे यांनी सांगितले की, राज्य सरकारने झोपु योजनेअंतर्गत देण्यात येणाºया २२५ चौरस फुटांच्या जागेत वाढ करत २००८ साली २६९ चौरस फुटांची सदनिका देण्याचा निर्णय जाहीर केला. त्या निर्णयानुसार बिल्डरने वाढीव क्षेत्रफळासाठी २००८ साली आॅक्टोबर महिन्यात रहिवाशांची बैठक बोलावली. त्यानंतर २०१७ पर्यंत गृहनिर्माण संस्थांसोबत बिल्डरने बैठक घेतली नाही.

Web Title: Area of ​​changed tents before permission; With Prakash Mehta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.