'...त्यामध्ये मुस्लीम नव्हते का?', 'सौगात-ए-मोदी'वर टीका करणाऱ्या विरोधकांना उपमुख्यमंत्री शिंदेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 18:28 IST2025-03-29T18:26:53+5:302025-03-29T18:28:07+5:30

Eknath Shinde Saugat E Modi Kit: भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाच्यावतीने देशभरात सौगात ए मोदी किटचे वाटप केले जात आहे. या उपक्रमावर विरोधकांकडून टीका केली जात आहे. याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदाच भाष्य केले.

Aren't the government's plans for Muslims? Eknath Shinde asked the opposition who criticized the Saugat E Modi kit | '...त्यामध्ये मुस्लीम नव्हते का?', 'सौगात-ए-मोदी'वर टीका करणाऱ्या विरोधकांना उपमुख्यमंत्री शिंदेंचा सवाल

'...त्यामध्ये मुस्लीम नव्हते का?', 'सौगात-ए-मोदी'वर टीका करणाऱ्या विरोधकांना उपमुख्यमंत्री शिंदेंचा सवाल

Eknath Shinde Saugat E Modi News: रमजान महिन्यात भाजपने सौगात ए मोदी किटच्या वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. खाद्यपदार्थांचा समावेश असलेल्या या किट देशभरात वाटल्या जात आहेत. पण, एकीकडे मुस्लीम विरोधी भूमिका भाजप घेते आणि दुसरीकडे सौगात ए मोदी कीट वाटत असल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. भाजपच्या सौगात ए मोदी आणि विरोधकांच्या टीकेवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भूमिका मांडली. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी पुण्यात होते. यावेळी माध्यमांनी त्यांना सौगात ए मोदी किटवर विरोधकांकडून होत असलेल्या टीकेबद्दल प्रश्न विचारला. त्यावर उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, "आधी ही माहिती घ्या की, जे बोलणारे आहेत; त्यांनी लोकसभा निवडणुकीत कसे वर्तन केले? कसे फेक नरेटिव्ह पसरवले. आरक्षण जाणार, संविधान बदलणार. मुस्लिमांमध्ये भीती तयार केली."

हेही वाचा >>"आता हेच लोक उद्धव ठाकरेंना का प्रिय झाले आहेत?"; बावनकुळेंचा ठाकरेंना संतप्त सवाल

त्यात मुस्लीम नव्हते का? शिंदेंचा विरोधकांना सवाल

"सगळं काही केलं गेलं. संविधान धोक्यात आहे, असे म्हटले गेले. पण, तेच लोक आज मोदीजींवर आरोप करत आहेत. मोदीजींनी ३५ कोटी जनतेला दारिद्रय रेषेतून वर आणले. ८० कोटी लोकांना मोफत रेशन देतात. लखपती दीदी योजना आहे. ड्रोन दीदी योजना आहे. जनधन योजना आहे. त्यात काय फक्त हिंदू आहेत का? त्यात मुस्लीम नाहीत का? सगळे लोक आहेत", असा सवाल शिंदेंनी विरोधकांना केला. 

'लोकसभेपासून त्यांचं पोट दुखतंय'

"कोणताही भेदभाव नाहीये. जितक्याही योजना आहेत, त्या सगळ्या योजना सर्व समाजासाठी, सर्व धर्मांच्या लोकांना मिळतात. त्यामुळेच तर त्यांच्या पोटात दुखत आहे. लोकसभेपासून त्यांचं पोट दुखत आहे. सगळी गडबड झाली आहे", अशा शब्दात शिंदेंनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले.   

Web Title: Aren't the government's plans for Muslims? Eknath Shinde asked the opposition who criticized the Saugat E Modi kit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.